समाजातील उत्कृष्ठ कार्याबद्दल वडुरा दिघी(जहानपूर)येथील महिलांचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मान…

 

युवराज डोंगरे/खल्लार

      महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाच्या वतीने दिनांक 31 मे 2023 रोजी राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना विशेष पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची योजना यावर्षी पासून सुरू केली आहे.

         त्यामध्ये वडूरा- दिघी(जहानपूर) ग्रामपंचायत तर्फे गावातील बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन करून महिलांची आर्थिक उन्नती करण्यासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्य करणाऱ्या सौ. विजया प्रकाश सगणे दिघी व सौ. शितल मंगेश उंबरकर वडूरा यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सरपंच बाबुरावजी नितनवरे , उपसरपंच सौ. प्रणीताताई नांदने ग्रामपंचायत सदस्य आशिष बुंधाडे, सौ. लताताई डाखोडे, पोलीस पाटील नितीन सिरस्कार दिघी , दिलीप पवार वडूरा अंगणवाडी सेविका ,आशा , ग्रामपंचयत कर्मचारी समस्त गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव सगणे यांनी केले.