उमाकांत बांगडकर”राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित”…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी :– नेहरू युवा मंडळ,मुर्तिजापूर आणि तरुणाई फाऊंडेशन कुटासा (अकोला) यांच्या संयुक्त विद्यमाने दहावे राज्यस्तरीय शुभम मराठी बाल,कुमार,युवा,नवोदित साहित्य संमेलनात शेतकरी वाडा,कृषी पर्यटन केंद्र,बहादुरा ता.बाळापुर (अकोला) येथे जेष्ठ साहित्यकार संमेलनाध्यक्ष श्री.शिवलिंग काटेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.,

        उदघाटक मुंबई येथील बालकलाकार(धर्मवीर-2 फेम) श्री.अथर्व मोरे,प्रसिद्ध साहित्यिक अभिनेते यांच्या हस्ते करण्यात आले.

            कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून श्री.डॉ.तुषार बैसाणे,वर्धा येथील यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.संदिप काळे,लेखिका प्रा.दिपाली सोसे,प्रा.डॉ.ममता इंगोले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

              सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागताध्यक्ष श्री.विठ्ठल माळी यांचे हस्ते बाबुळवाडा जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक श्री.उमाकांत भगवान बांगडकर यांना सपत्नीक,”राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक विद्यारत्न,”पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

           पुरस्कार मिळाल्याबद्दल पारशिवनी पं.स.चे खंडविकास अधिकारी श्री.सुभाष जाधव,गटशिक्षणाधिकारी श्री.कैलास लोखंडे,शिक्षणविस्तार अधिकारी श्री.सुनिल कोडापे,केंद्रप्रमुख सौ.उर्मिला गायकवाड,बाबुळवाडा येथील लालबहादुर शास्त्री विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.राजश्री उखरे,सेवानिवृत्त शिक्षक,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री गोपाल कडू,पत्रकार श्री कमलसिंह यादव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.दिपाली झुरे,सरपंच सौ.रंजना रेवतकर,सामाजिक कार्यकर्ते श्री.इंद्रपाल गोरले आणि समस्त शिक्षक मित्र परिवारांनी त्याचे अभिनंदन केले.