युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार नजिकच्या बेंबळा बु येथे पर्यावरण पूरक जिवन पद्धती अभियान सप्ताह अंतर्गत हवामान अनुकूल शेती पद्धती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकारी व शेतकऱ्यांना कृषी विभागातील विविध योजने बाबत व महाडीबिटी पोर्टल वर अर्ज करुण यांत्रिकीकरणाचा लाभ घेणे बाबत माहिती ए. एम. राणे सर कृषि पर्यवेक्षक यांनी दिली. तसेच घरचे सोयाबिन बियाण्याचा वापर करून पेरणी करणे, बियाण्याची उगवणक्षमता तपासणे, बीजप्रक्रिया, योग्य वाणांची निवड करुण पेरणी कारणे व खरीप हंगाम २०२३ करिता महाडिबिटी- शेतकरी योजना” पोर्टल वर बियाणे अनुदानाचा लाभ घेणे बाबत व मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून शेततळ्यांचा लाभ घेणे बाबत सविस्तर मार्गदर्शन ए. बी. घोम कृषि सहाय्यक यांनी केले.तसेच बी. बी. एफ. तंत्रज्ञान, रुंद वाफा सरी पद्धत, शून्य मशागत तंत्रज्ञान बाबत रुपेश हरणे सर तंत्रज्ञान समन्वयक पोकरा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच पि.एम.एफ.एम.ई. योजने अंतर्गत वयक्तिक व गटा मार्फत अर्ज करुण सदर योजनेचा लाभ घेणे बाबत सविस्तर माहिती विशाल भडके आत्मा यांनी सविस्तर माहीती दिली.तसेच शून्य मशागत तंत्रज्ञान क्षेत्रावरील भेटी दिलेले अनुभवी शेतकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला समुह सहाय्यक एस. जे. काळकर, बी. एस.खंडारे, कृषि मित्र,कृषिताई, ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्राम कृषि संजीवनी समिती सदस्य, तसेच गावातील शेतकरी बांधव व महिला बचत गट प्रतिनिधी महिला उपस्थित होत्या.