प्राचार्यांसह १५८ जणांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल..‌

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

           वृत्त संपादीका 

       कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात के. एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनिता मन्ना यांच्यासह 158 जणांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात व्यवस्थापन समितीचाही समावेश आहे.

      खडकपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,के.एम. अग्रवाल महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेल्या भाऊराव तायडे नावाच्या कर्मचाऱ्यावर अनुसूचित जातीचा असल्याचा खोटा आरोप करून त्याला जबरदस्तीने नोकरीतून काढून टाकण्यात आले.

       सुमारे सहा वर्षे हे प्रकरण सुरुच होते.दरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरूच होते,पण पोलिस तपासात ग्रंथपाल भाऊराव तायडे यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.

      अखेर सहा वर्षांनंतर सत्य बाहेर आल्याने पोलिसांनी के. एम.अग्रवाल कॉलेजच्या प्राचार्या डॉ.अनिता मन्ना यांच्यासह 158 जणांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

      हा गुन्हा दाखल झाल्यानंतर के.एम.अग्रवाल कॉलेजमध्ये खळबळ उडाली होती,कारण त्यात संपूर्ण प्रशासन समितीचाही सहभाग आहे.के.एम.अग्रवाल कॉलेजमध्ये प्राचार्य,प्रशासकीय समिती आणि कर्मचाऱ्यांसह सुमारे 160 जणांचा स्टाफ असल्याचे सांगण्यात येते.

       ज्यामध्ये 158 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिलीच घटना आहे.