
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
औरंगजेबाच्या कबरीवरुन उफाळून आणल्या गेलेला वाद हा दंगल घडवून आणण्या पर्यंत गेलाय.
यात मनुष्य हानीसह करोडो रुपयांच्या वाहणांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मात्र,ज्यांनी दंगल घडवून आणली आणि ज्यांनी दंगल घडवून आणण्यासाठी चिथावणीखोर भाषेचा वापर केला त्यांचा शोध नागपूर पोलिस कोंम्बिंग आप्रेशन द्वारे घेत आहेत.
पोलिस स्टेशन कोतवाली,गणेशपेठ,तहसील,लकडगंज,पाचपावली,शांतीनगर,सक्करदरा,नंदनवन,इमामवाडा,येशोधरा नगर आणि कपिलनगर हद्दीत (परिसरात) संचारबंदी नागपरचे पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी लागू केली आहे.
या ११ पोलिस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी काळात झगडेभांडण करता येणार नाही, सामाजिक आणि इतर प्रकारची शांतता भंग करता येणार नाही.याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त नागरिकांना उभे राहण्यास किंवा बसण्यास बंदी करण्यात आली आहे.
दळणवळण व्यवस्था सुरळीत सुरू असली तरी आज बऱ्याच ठिकाणची दुकान लाईन बंद ठेवण्यात आली होती.
जिवणावश्यक वस्तूंचे दुकाने काही काळ सुरू होती.तद्वतच आरोग्य तपासणी आणि औषधोपचार संबंधाने सुट आहे.
मात्र,संचारबंदी लागू असलेल्या सदर ११ पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस यंत्रणा चौकस असून पोलिसांच्या अनेक फेऱ्या ठिकठिकाणी होत आहे.
याचबरोबर पोलिस अधिकारी अलाउंसिंग द्वारे नागरिकांना आवश्यक सुचना देताना दिसत आहेत.
दंगलखोरांना शोधण्यासाठी पोलिस विभाग कोंम्बिग आप्रेशन केव्हा कुठे राबविणार हे सांगणे कठीण आहे..
११ पोलिस स्टेशन अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आल्यापासून हद्दीतील नागरिक सतर्क झाले असून कुणासोबतही वादविवाद करणे टाळत असल्याचे दिसून येत आहे.याचबरोबर वादविवाद होणारच नाही या भुमिकेतून त्यांची वर्तणूक पुढे येत आहे.
“कारु झाले काय वर आले पाय,या म्हणीप्रमाणे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची दक्षता नागपूरकर घेत आहेत.