
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
महायुती सरकारने निवडणूक अगोदर आपल्या जाहीरनाम्यात व भाजपा नेत्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना कर्जमाफी करू व लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देऊ असे जाहीर केल्यानंतर निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही त्या दोघांच्या भावनाशी खेळून वरील दोन्ही अती महत्वाच्या घोषणा चा विसर पडल्याने शेतकऱ्यांचा व लाडक्या बहिणींचा विश्वासघात का केला ? असा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अमरावती महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ अलका निलेश पारडे यांनी केला आहे.
अर्थसंकल्प अधिवेशनच्या माध्यमातुन नेमका प्रश्न हा आहे की लाडकी बहीण योजना सुरू असताना निवडणूक अगोदर कोणतीही अट घालण्यात आली नव्हती पण निवडणूक झाल्या बरोबर अटी तयार करून लाडक्या बहिणीं कशा आता सावत्र होऊ लागल्या आहे म्हणजे निवडणूक अगोदर फक्त त्यांचे मते पाहिजे म्हणून तर अटी घालण्यात आल्या नव्हत्या का? हा देखील प्रश्न आहे म्हणजे हा निवडणूक जुमला होता का?
त्यानंतर शेतकऱ्यांना तर फक्त निवडणूक असली तर आठवण करायची व आम्ही कसे शेतकऱ्यांचे कैवारी आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला व नेमके शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही.
सत्ताधारी फक्त मंत्रिपदे, पालकमंत्री पद व आता एकमेकांवर कुरघोडी कशी करता येईल हाच प्रयत्न होत आहे.म्हणून जे जे जाहीरनामा मध्ये निवडणूक अगोदर प्रसिद्ध केले आहे ते आता सरकारला पूर्ण करावेच लागेल अन्यथा आम्ही महाराष्ट्र मधील जनतेची दिशाभूल केली आहे असे सरकारने सांगितले पाहिजे असे सुद्धा महिला आघाडी अमरावती जिल्हाप्रमुख सौ.अलका निलेश पारडे यांनी म्हटले आहे.