तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दर्यापुरात मोठ्या उत्साहाने साजरी… 

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

           शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वाखाली दर्यापूर मध्ये मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

         त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. विशेष महत्त्व देत सांप्रदायिक दिंडी आणि मराठमोळ्या अंदाजात संतकृपा सांप्रदायिक महिला भजन मंडळ पिंगळा,श्री संत गजानन महाराज भजन मंडळ आमला ,जय बजरंग हरिपाठ मंडळ पळसो बढे,माय मंजुळा माता महिला, भजन मंडळ कांन्होली, माऊली भजन मंडळ गायत्री नगर दर्यापूर असे सांप्रदायिक दिंडी पथके तर डीजे आकर्षण म्हणजे घोड्यावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज यांचे हुबेहुब प्रतिबिंब व त्याच्या सोबत घोड्यावर मावळे होते.

        त्यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दर्यापूर विधानसभा मतदारसंघचे आमदार गजानन लवटे,सहकार नेते व दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते सागर पाटील गावंडे, आरपीआय तालुका अध्यक्ष अनिल गवई, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद धनोकार, विधानसभा संघटक बबनराव विल्हेकर, युवासेना तालुकाप्रमुख सागर गिरहे, दर्यापूर शहर प्रमुख गोपाल अग्रवाल महिला आघाडी जिल्हाप्रमुख अलका पारडे यांनी पूजा करून हार अर्पण केले व छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी,शिवसेना जिंदाबाद, उध्दव ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है असे गगनचुंबी नारे देण्यात आले व फार मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आले.

         त्यावेळी दर्यापूर नगरीत शिवमय वातावरण निर्माण झाले होते व सर्व दर्यापूर वासियानी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले. त्यावेळी आमदार गजानन लवटे, युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, सहकार नेते सुधाकर पाटील भारसाकळे,प्रमोद धनोकार, बबनराव विल्हेकर विधानसभा संघटक, युवासेना तालुका प्रमुख सागर गिरे, माजी सरपंच सतीश साखरे, सरपंच किशोर टाले, सरपंच मोहन बायस्कार,जगदीश बरडे,पद्माकर राऊत,राजू मानकर ,गुणवंत पाटील गावंडे,प्रदीप वडतकर, दर्यापूर तालुका महिला आघाडी तालुका प्रमुख सौ गीता अढाउ, राजन देशमुख,शरद आठवले,खंडू पाटील राऊत,अमोल अरबट,शरद गावंडे,दीपक बगाडे,भास्कर धोटे,निलेश इंगोले,प्रशांत भांगे,निलेश खलोकार,दर्शन चोरपागार,निलेश जामनिक,वेदांत साखरे,शुभम विल्हेकर, विशाल बगाडे,प्रवीण बायस्कर निलेश राऊत,प्रशांत ठाकूर, युवासेना तालुका प्रमुख सागर गिरहे,रुपेश मोरे,आशिष लायडे,नितीन माहुरे, शिवराज ठाकरे, सुरज कैकाडी, अनिकेत वाघझाडे, राज गुजराथी,करण चक्रे,मंगेश गावंडे,संजय घरडे,संदीप कुटेमाटे,प्रशांत धर्माळे, संदीप धर्माळे, भरत गावंडे, शुभम विल्हेकर, अमोल कुलट,इत्यादी उपस्थित होते.