
युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दर्यापूरच्या वतीने उत्सव माझ्या राजाचा हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
यानिमित्य वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या गड किल्ले बनविणे, बॅडमिंटन, रांगोळी, थाली सजावट ,इत्यादी स्पर्धेच्या अनुषंगाने दर्यापूर करांकरिता आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये बॅडमिंटन स्पर्धा क्रीडा संकुल दर्यापूर येथे चालू असून त्या दोन दिवस अधिक चालणार आहे तसेच थाली सजावट स्पर्धा सुद्धा घेण्यात येणार आहे. रामदेव बाबा मंदिर बनोसा येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली असून त्या स्पर्धेमध्ये एकूण 29 स्पर्धकांनी भाग घेतलेला होता. थोर महापुरुष, पर्यावरण व महिला सशक्तिकरण या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धकांनी उत्कृष्ट अशा रांगोळीचे सादरीकरण केले. या रांगोळी स्पर्धेला दर्यापूरचे तहसिलदार डॉ.रविंद्र कानडजे,ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख ,धनंजय धांडे, इन्स्पायर ग्रुपच्या संचालिका वृषालीताई ताले तसेच इतर अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आणि स्पर्धकांचे तसेच आयोजकांचे अभिनंदन सुद्धा केले.
सदर स्पर्धेकरिता निरीक्षक म्हणून सुनिताताई साखरे, जयश्रीताई चव्हाण, शुभांगी ताई येवले,वर्षाताई कावडकर, सीमाताई गोलाईत यांनी काम पाहिले या स्पर्धेकरिता हर्षाताई बावणेर महिला तालुकाध्यक्ष, रूपाली ताई तायडे,अर्चनाताई राऊत, यांनी परिश्रम घेतले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना दर्यापूरच्या सर्व कार्यकारणी यांनी स्पर्धेकरिता सहकार्य केले.
सदर स्पर्धेचा निकाल तसेच बक्षीस वितरण कृषी भवन दर्यापूर येथे दिनांक 22 मार्चला रोज सायंकाळी करण्यात येईल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दर्यापूर तालुकाध्यक्ष मनोज तायडे, उप तालुकाध्यक्ष पंकज कदम विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रथमेश राऊत, गोपाल तराळ, राम शिंदे, संदीप झळके, अनिकेत सुपेकर, मेहर ठाकरे, प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले केले.