
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
प्रा.मा.म.देशमुख हे महाराष्ट्रातील एक थोर इतिहास संशोधक आणि परिवर्तन चळवळीचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात.
त्यांनी आपल्या लेखन आणि संशोधनाद्वारे समाजातील प्रतिगामी विचारसरणीविरुद्ध लढा दिला आणि बहुजन समाजाच्या उत्थानासाठी महत्वपूर्ण कार्य केले.
त्यांच्या “मध्ययुगीन भारताचा इतिहास” या ग्रंथामुळे प्रतिगामी उच्चवर्गाने विरोध दर्शविला,ज्यामुळे नागपूर विद्यापीठासमोर ग्रंथाची होळी करण्यात आली आणि त्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
मात्र,बहुजन विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी या विरोधाला प्रत्युत्तर देत त्यांच्या समर्थनार्थ गौरव मिरवणूक काढली.
प्रा.मा.म.देशमुख यांनी विविध ग्रंथांच्या माध्यमातून मनुवादी विचारसरणीला आव्हान दिले आणि बहुजन समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले.
त्यांच्या या कार्यामुळे ते आजही परिवर्तनवादी विचारांच्या प्रेरणास्त्रोत म्हणून ओळखले जातात.
प्रा.मा.म.देशमुख सरांना भावपूर्ण आदरांजली…