
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
अर्थ संकल्पिय अधिवेशना दरम्यान,”अवैध वाळू उत्खननाकडे पाठ फिरवणारे किंवा दुर्लक्ष करणारे धुर्तराष्ट्र म्हणजे अधिकारी आहेत असे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
जे वाळूचे अवैध उत्खनन करतात त्यांच्या सोबत हे धुर्तराष्ट्र चांगले संबंध ठेवतात आणि जे अवैध वाळू उत्खननाच्या विरोधात बातम्या प्रकाशित करतात किंवा वाळूचे अवैध उत्खनन उजागर करतात त्यांचा विरोध करतात,त्यांना वाईट म्हणतात असेही सुधीरभाऊ मुनगंटीवार प्रश्नोत्तराच्या वेळी विधानसभेत म्हणाले.
याचबरोबर जे लोक वाळूचे अवैध उत्खनन करतात त्यांचे ट्रॅक्टर,ट्रक,गावकऱ्यांनी पकडून दिल्यास ते ट्रॅक्टर,ट्रक बक्षीस म्हणून गावकऱ्यांना दिले जावे असा मुद्दा सुध्दा त्यांनी उपस्थित केला होता.तद्वतच घरकुल लाभार्थ्यांना १५ दिवसांच्या आत ५ ब्रास वाळू मंजूर न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,जे अधिकारी घर बांधकामासाठी अर्ज दिनांकापासून १५ दिवसांच्या आत ५ ब्राश वाळूची मंजुरी देणार नाही त्यांच्यावर उचित कारवाई करु….
आणि ट्रॅक्टर किंवा ट्रक गावकऱ्यांनी पकडून दिल्यास त्यावर काय कारवाई करणार हे १५ दिवसात ठरवू असे आश्वासन महसूल मंत्र्यांनी सभागृहात चर्चा दरम्यान आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांना दिले.
मात्र,माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची मागणी आहे की,वाळूच्या अवैध उत्खननातंर्गत ट्रॅक्टर,ट्रक,हायवा गावकऱ्यांनी पकडून दिल्यास ते ट्रॅक्टर,ट्रक, हायवा सदर मालकाला अजिबात मिळायला नको.
यावरही सकारात्मक उत्तर देत १५ दिवसात योग्य निर्णय घेऊ असे महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
मात्र,अवैध वाळू उत्खननाला संबंधित अधिकारी जबाबदार असतील तर त्यांच्यावर सुध्दा फौजदारी कारवाई व्हावी अशी नागरिकांची रास्त मागणी आहे.
याचबरोबर जनता म्हणतय,अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई होणे आवश्यक आहे.यावर आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी विधानसभेत परत प्रश्न उपस्थित केला पाहिजे.
अवैध वाळू उत्खननाचा मुद्दा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित करणे म्हणजे विविध स्तरावरुन अवैध वाळू उत्खनना बाबतच्या प्रकाशित होणाऱ्या बातम्यांना न्याय देण्यासाठीचे पहिले पाऊल आहे असे समजावे लागेल…