महापुरुषांच्या बरोबरीने बॅनरवर फोटो लावल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमूरचा इशारा…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी  

      चिमूर क्रांती तालुका वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा असलेला चिमूर क्रांती तालुका स्वातंत्र्याचा पहिला टप्पा चिमूर क्रांती भुमीत निर्माण झाला.

      पंरतु याच चिमूर क्रांती भुमीत जेव्हा कधी महापुरुषांची जंयती किंवा पुण्यतीथी असते तेव्हा बॅनरवरती महापुरुषांच्या बरोबरीने ज्याची तुलना करु शकत नाही असे फोटो झडकुन दिसतात.

      पंरतु यावर नगरपरिषद चिमुरच्या मुख्याधिकारी यांनी अश्या प्रकारच्या बॅनरला परवानगी देऊ नये असे आवाहन भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमूर तालुका कार्याध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी केले.

       अन्यथा संबंधित जो कोणी बॅनर वरती महापुरुषांच्या बरोबरीने फोटो लावुन महान असल्याचे उदात्तीकरण करेल त्याच्या फोटोला चपलाचे हार घालुन फोटो वायरल करण्याचा इशारा जगदीश मेश्राम यांनी दिला.

      कारण महापुरुषांच्या बरोबरीने फोटो लावणे हा महापुरुषांचा अपमान आहे,त्यामुळे नगरपरिषद मुख्यकार्यकारी चिमुर यांनी दक्षता घ्यावी.

       अन्यथा नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करु असा इशार निवेदनातुन नगरपरिषद चिमूर मुख्याधिकारी यांना देण्यात आला.