आळंदीत शनिवारी श्री ज्ञानदेव वाड्मय चिंतन व्याख्यानमालेचे आयोजन…. 

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोस्तव सप्तशतकोत्तर ७५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, संत ज्ञानदेव अध्यासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग – सामुहिक चिंतन महाप्रकल्प अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ज्ञानदेव वाड्मय चिंतन एकदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन शनिवार (दि.२२) रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान भक्तनिवास सभागृहात करण्यात आले आहे. 

         श्री ज्ञानदेव वाड्मय चिंतन एकदिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ.नारायण महाराज जाधव, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, आचार्य अनिल सहस्रबुद्धे, डॉ.दिलीप धनेश्वर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

        श्री ज्ञानदेव वाड्मय चिंतन एकदिवसीय व्याख्यानमालेत पहील्या सत्रात वक्ते डॉ.मुकुंद दातीर, दुसऱ्या सत्रात डॉ.अरुणा ढेरे व तिसऱ्या सत्रात अभय टिळक हे व्याख्याते ज्ञानदेवीय भक्ती योग्य आणि दशोपनिषदे, ज्ञानदेवांचे वाड्मयीन योगदान व श्री ज्ञानेश्वर नाथपंथ आणि शैवगाम याविषयावर मार्गदर्शन करणार आहे यावेळी व्याख्यानमालेचा समारोप संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.