महाबोधी महाविहार मुक्ती साठी २० मार्चाला चिमूरात विशाल मोर्चा..‌ — जगप्रसिद्ध भदंत ज्ञानज्योती महाथेरो करणार मोर्चाचे नेतृत्व.‌‌..

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये 

       बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन देशभर सुरू आहे.त्याप्रमाणे या आंदोलनास पाठींबा आणि बुद्धगया येथील महाबोधी महाविहार १९४९ च्या व्यवस्थापन कायदा तात्काळ रद्द करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापण हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे,या मागणीला घेऊन येत्या २० मार्च रोजी संविधान चौकातून तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

        भिक्खु संघ संघारामगिरी चिमूर,भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल आणि बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.या आंदोलनाचे नेतृत्व भदंत ज्ञानज्योती महाथेरो आणि भिक्खू संघ करणार आहेत.

        सकाळी अकरा वाजता संविधान चौकातून राष्ट्रीय महामार्गाने मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून तहसील कार्यालयावर धडकणार आहे. 

        यांनतर मोर्चाचे सभेत रूपांतर होईल.चिमूर तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक व उपासिकांनी बौध्दगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष विलास राऊत,सचिव शुभम मंडपे,कोषाध्यक्ष प्रशांतकुमार देठे,उपाध्यक्ष प्रकाश मेश्राम,ऋषीकेश मोटघरे,आशीष खोब्रागडे,जगदिश मेश्राम,गोपी घुटके,सहसचिव राजीव अलोणे,आशीष मेश्राम,आशीष बोरकर,आकाश भगत,मनोज राऊत,अस्मीत रामटेके,सल्लागार समितीचे डॉ.भदंत धम्मचेती,एन.आर. कांबळे,अँड.भुपेश पाटील,अँड. नितीन रामटेके,अँड.जयदेव मुन,महेंद्र बारसागडे यांनी केले आहे.

******

  वृत्त संकलन..‌

उपक्षम रामटेके – मुख्य कार्यकारी संपादक..‌

शुभम गजभिये – विशेष प्रतिनिधी….