
महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्याच्या पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडा….
— आणि RSS चा डाव हाणून पाडा….
“कुणाकडूनही एक रुपया सुद्धा जयंतीची वर्गणी घेऊ नका…..
कोणत्याही आजी – माजी ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती सदस्य,जिल्हापरिषद सदस्य,आमदार-खासदार,मंत्री यांना जयंतीत भाषणाला अजिबात बोलवू नका…..
कारण,बंधुनो आणि भगिनींनो असे बोंबलत सुटणाऱ्या चौथी पास नेत्यांच्या अमंगळ तोंडातून सात पदव्या घेणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव शोभत नाही.शिवाय जन्मभर तुमच्या मड्यावरच्या टाळूवरचे लोणी खाणारी ही औलाद आहे.म्हणून त्यांना बोलावून पवित्र महापुरुषांचा अपमान करु नका….
कोणत्याही गायकांचे कार्यक्रम लाखो रुपये देऊन ठेऊ नका.यातून प्रबोधन होते. हा आपला गैरसमज आहे.ज्याप्रमाणे वामनदादा बुद्धक्रांती आणि भीमक्रांती अर्थात धम्मक्रांती आणि संविधानक्रांती देशात गायन कार्यक्रमातून प्रसार करत होते.तेंव्हा त्यांची ठरलेली फीस कधीच नव्हती!
तर ते गाताना जे पॆसे जमा होत असत त्यातील नोटा सर्व सहकाऱ्याना वाटून देत असत,आणि खुर्दा फक्त स्वतःसाठी ठेवत असत,म्हणून वामनदादा क्रांतीकारी ठरले.
आपल्याला जर असं वाटत असेल की,गायकांच्या नावाने गर्दी जमवू आणि मग प्रबोधन करू.हा साफ आणि चुकीचा गैरसमज आहे.
गायकांच्या कार्यक्रमाला पाय ठेवायला जागा नसते आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमात 75 % मंडप खाली!
प्रबोधन कर्त्याना बोलावताना सुद्धा,आपण त्यांचे आचरण समजून घेऊनच बोलावले पाहिजे.त्यांना जाण्या – येण्याच्या खर्चाशिवाय अतिरिक्त पॆसे कुणीही देऊ नये…
डी.जे.अजिबात लाऊच नये. ज्यामुळे ध्वनीप्रदूषण होऊन सर्व लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे….
कुणालाही जयंतीसाठी वर्गणी जबरदस्तीने मागू नये. केवळ समितीने त्या त्या विहारात,मंदिरात फलकावर सूचना लिहावी की एवढा जयंतीचा कमीत कमी खर्च आहे.आपण या अमुक व्यक्तीकडे तुमच्या स्वेच्छेने जमा करावी.
कोणत्याही उपस्थित असलेल्या चारित्र्यवान वयस्कर नागरिकाकडून ध्वजारोहण करुन घ्यावे.
कोणत्याही व्यसन करणाऱ्या व्यक्तीला कार्यक्रमात प्रवेश देऊ नये.
लहान मुले आणि वीद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनातील चारित्र्याच्या सत्य घटना सांगून त्यांनी संकटावर कशी मात केली याचे वर्णन करुन त्यांच्या जीवनातील यशासाठी कसे जगावे यासाठीच प्रबोधन कर्त्यांना बोलवावे….!
म्हणून पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन जर आपण जयंत्या साजऱ्या करण्याचा दृढनिश्चय करुन अमलात आणला……
तर निश्चितच RSS / मोदी – शहा / भाजप / फसणवीस आणि यांचा संविधानविरोधी गोतावळा यांच्या उरात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही..
आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, रेणापूरकर,औरंगाबाद 7875452689..