
परिवर्तनाच्या प्रेरणा आणि अवरोध…
विकास आणि परिवर्तन यात फरक हा की,विकास ही एक स्थिती आहे,आणि परिवर्तन म्हणजे प्रक्रिया.प्रक्रिया ही निरंतर असते.ती थांबत नाही.प्रक्रियेतून च परिवर्तन होते.एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणे म्हणजे बदल.परिस्थिती बदलणे म्हणजे विकास.किंवा मागासलेपण. अधोगामी प्रक्रिया म्हणजे मागे घेऊन जाणारी प्रक्रिया आणि त्यातून निर्माण झालेली किंवा बदललेली स्थिती म्हणजे मागासलेपण किंवा प्रतिगामीत्व.प्रतीगमित्व म्हणजे पुढे जाण्या ऐवजी परत माघारी जाने किंवा तिथेच थांबणे.पुढे न जाणे,प्रगती न करणे,विकास न होणे.म्हणजे प्रतिगमित्व आणि मागासलेपण होय.ही झाली स्थिती.ही स्थिती केंव्हा निर्माण होते ? प्रक्रिया झाल्यामुळे.परिवर्तन मुळे.परिवर्तन म्हणजेच प्रक्रिया होय.जसे की पाणी ही एक अवस्था होय,स्थिती होय.या पण्यास जेंव्हा उष्णता दिली जाते,म्हणजे तापाविल्या जाते तेंव्हा त्यात प्रक्रिया सुरू होते,एक अंश सेंटीग्रेड तापमान पासून हळू हळू ते एक दोन तीन असे एकूण शंभर अंश सेंटि ग्रेड होते,तेंव्हा ते पाणी राहत नाही,तर त्याचे रूपांतर वाफेत होते,याच प्रमाणे पाण्यास थंड हवा दिली,त्यास 100 अंश सेंट ग्रेड थंडी दिली की त्याचे बर्फ बनते.याचा अर्थ पदार्थ हे प्रक्रिये द्वारा त्याचे रूपांतर होऊन दुसरे रूप घेतात.म्हणजेच प्रक्रियेने रूप बदलते.हे बदललेले रूप म्हणजे विकास होय.माणसाचा विकास,परिस्थितीचा विकास,देशाचा विकास हा परिवर्तना मुळे म्हणजेच परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे घडत असतो.विकसित माणूस,विकसित समाज,विकसित देश हा परिवर्तनाच्या प्रक्रियेतुन च घडत असतो.आणि परिवर्तनाची प्रक्रिया थांबली की विकास थांबतो.
या पार्श्वभूमीवर आपणास ” परीवतानाच्या प्रेरणा आणि अवरोध म्हणजे अडथळे ” हा विषय समजायला सोपा जाईल.
परिवर्तनाच्या प्रेरणा दोन असतात,1 आधोगामी .2 ऊर्ध्वगामी आधोगमी म्हणजे मागे घेऊन जाणे ,किंवा मागास होणे,आणि ऊर्ध्वगामी म्हणजे प्रगतिशील,प्रगतीच्या पथावर,पुढे नेणाऱ्या.यासच प्रतिगामी आणि पुरोगामी असेही म्हणतात.
बुद्धिवादी ,विज्ञानवादी,विवेकवादी,मानवतावादी,समतावादी प्रेरणा या पुरोगामी,ऊर्ध्वगामी ,प्रगतिशील असतात,या प्रेरणा परिवर्तनाची प्रक्रिया,आणि विकासाला पूरक असतात.तर देव,धर्म,अंधश्रध्दा,दैव नशीब या प्रेरणा म्हणजे प्रतिगामी ,अधोगामि प्रेरणा होत.या परिवर्तनाच्या प्रक्रियेस आणि विकासाच्या प्रक्रियेत अडसर बनतात.कारण व्यक्तीचा विकास,समूहाचा विकास,देशाचा विकास हा देवाच्या कृपेने,दैवनुसार,धर्माच्या आज्ञेने होतो,ही प्रेरणा माणसाला निस्क्रीय बनवते,आळशी बनवते,ऐतखाऊ बनवते,परावलंबी बनवते,या प्रेरणांचा परिणाम हा असेल तर माणूस प्रयत्नशील बनणार नाही.या प्रेरणामुळे माणसातील कौशल्य,क्षमता,बुध्दिमत्ता,शक्ती ,विचार यास चालना मिळणार नाही.माणसातील सर्जनशीलता,नवीन निर्माण करण्याची कला,जिद्द यास वाव मिळणार नाही,त्याच्या व्यक्तिमत्वाची जडण घडण होणार नाही.एकंदरीत माणूस जन्मला,वाढला,आणि एके दिवशी गेला. या पलीकडे त्याचा विकास प्रगती शक्यच होणार नाही.
रूढी परंपरा ,संस्कृती,शिकवण यानुसार माणूस नम्रतेने कितीही जरी म्हंटला की ” मी केलेली प्रगती ही माझी नसून याचे श्रेय ईश्वरास,माझ्या दैवास ,माझ्या श्रध्देस जाते”. हे बुध्दीला पटण्यासारखी गोष्ट नाही.सत्य हे आहे की,माणसाची ,समूहाची ,देशाची,समाजाची,प्रगती ही बुध्दी,प्रयत्न,कौशल्य,धोरण,युक्ती,नियोजन,शिस्त अशा काही गोस्थिमुळेच होत असते. केवळ ” हे देवा तूच करता आणि करविता,मी तुझे लेकरू कर माझा सांभाळ,माझी चिंता देवाला,देरे हरी पलंगावर,ठेविले अनंते तैसेचि रहावे,सारे काही विधी लिखित असते,देवापुढे काही नाही,कितीही प्रयत्न करून.काही उपयोगाचे नाही,जे दैवात आहे,जेव्हढे आहे,तेच तेव्हढेच मिळते.त्यापेक्षा काही जास्त किंवा कमी मिळत नाही”. अशी शिकवण ,संस्कार,प्रेरणा या प्रतिगामी विचारांच्या आपल्या पालकांनी आपणास दिल्या,त्यानुसार आपले विचार आणि वर्तन बनले,पण देव,धर्म,दैव,अंधश्रध्दा या प्रेरणा माणसाला पुढे न नेता मागेच घेऊन जातात.प्रगती खुंटते.म्हणून सामान्य जनता ही दुःख दारिद्र्य ,अज्ञान,अडाणीपणा, यात्तच अडकलेली आहे.
लेखक : दत्ताजी तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक : 16 मार्च 2025.
फोन : 9420912209.