ब्रेकिंग न्यूज… – मौजा कोलारी गावच्या ५ युवकांना जलसमाधी… — गावात शोककळा…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक…

      निसर्गरम्य पर्यटन स्थळ असलेल्या नागभिड तालुक्यातील घोडाझरीला चिमूर तालुक्यातील मौजा कोलारी येथील युवक आज गेले होते.

           घोडाझरी येथील नैसर्गिक वातावरण अनुभवल्या नंतर सदर पाचही युवकांनी येथील प्रसिध्द तलावात आंघोळ करण्याच्या उद्देशाने तलावाच्या पाण्यात शिरले.

     मात्र त्यांना घोडाझरी तलावातील पाण्याच्या खोल पातळीचा अंदाज आला नसल्याने ५ युवकांचा याच तलावात बुडून आज दुर्दैवी मृत्यू झाला.

     मृत्यू यूवकांचे नाव जनक गावंडे,यश गावंडे,अनिकेत गावंडे,तेजस गावंडे,तेजस ठाकरे असे आहेत.

              मात्र,एकाच गावातील ५ युवकांचा चंद्रपूर जिल्हातंर्गत नागभिड तालुक्यातील मौजा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू झाल्याने चिमूर तालुक्यातील मौजा कोलारी गावात शोककळा पसरली आहे.

       मात्र,त्यांच्या मृत्यू मागचे नेमके कारण काय? याचा खुलासा नागभिड पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न होईल असे दिसून येते आहे.