आदिवासी अजूनही शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित :- ऍड. सोनाली मेश्राम…  — चांदाळा येथे आसपाच्या वतीने क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी… आदिवासीच्या न्याय हक्कासाठी आजाद समाज पार्टी संघर्ष करणार :- विनोद मडावी…

ऋषी सहारे

  संपादक

गडचिरोली :- क्रांतीवीर बाबुराव शेडमाके जयंती निमित्त चांदाळा येथे आझाद समाज पार्टी युवा आघाडी व ग्रामवासियांच्या च्या वतीने आयोजित आदिवासीचे शिक्षण व शिक्षणातील समस्या यावर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न..!

         कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आझाद समाज पक्षाचे प्रभारी विनोद मडावी, उद्घाटक म्हणून ॲड. सोनाली मेश्राम, मार्गदर्शक म्हणून ASP जिल्हाध्यक्ष राज बनसोड, अतिथी म्हणून युवा आघाडी अध्यक्ष विवेक खोब्रागडे, गावातील पोलिस पाटील, यादवराव गोमस्कर तथा आदी गावातील ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. 

          शहरात मिळणारे शिक्षण व सुविधा खेड्यात सुद्धा मिळाव्यात यासाठी आजाद समाज पार्टी प्रयत्न करेल असे राज बन्सोड यांनी सांगितले.

          गावातील SC,ST, OBC सर्व समाजातून मोठ्या प्रमाणात बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.