ग्रामगीता महाविद्यालयाचे रेड रिबन क्लब आणि प्राणिशास्त्र विभागातर्फे सिकलसेल ऍनिमिया कार्यशाळेचे आयोजन…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

        ग्रामगीता महाविद्यालयाचे रेड रिबन क्लब आणि प्राणीशास्त्र विभागातर्फे दिनांक 10 मार्च ते 12 मार्च या कालावधीत तीन दिवसीय सिकलसेल ऍनिमिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

          या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनंदा आस्वले, मार्गदर्शक म्हणून आधीटेक संशोधन संस्था,पुणेचे संचालक, डॉ. देवेंद्र लिंगोजवार, रेड रिबन क्लब चे समन्वयक डॉ. निलेश ठवकर तसेच प्रा. डॉ. सुमेध वावरे आणि डॉ. युवराज बोधे उपस्थित होते.

         डॉ. देवेंद्र लिंगोजवार यांनी आपल्या मार्गदर्शनात आजच्या युगात विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता आवश्यक तंत्रज्ञान कशाप्रकारे विकसित करता येईल हे प्रात्यक्षिक व तंत्र प्रशिक्षण द्वारे करून दाखविले. डॉ.निलेश ठवकर यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी आवड निर्माण होईल व ते आपले ध्येय ठरवू शकतील असे मत व्यक्त केले.

           प्राचार्य डॉ.सुनंदा आस्वले यांनी सदर कार्यक्रमाच्या संकल्पनेची प्रशंसा केली व विद्यार्थ्यांना या कार्यशाळेच्या त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात नक्कीच उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली.

        कार्यशाळेमध्ये डॉ.देवेंद्र लिंगोजवार यांनी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रोफोरेसिस, पी. सी. आर, आर. एफ. एल. पी द्वारे कशाप्रकारे उत्कृष्ट प्रयोग केले जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

         सदर कार्यक्रमाचे संचालन वैभव बारेकर यांनी केले या कार्यशाळे करिता सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          या कार्यशाळेत श्री ज्ञानेश महाविद्यालय,नवरगाव येथील प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग दर्शविला आणि प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

           ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कु. तेजस्विनी गोहने, कु. पायल गोहणे, निकेश बारेकर, वैभव बारेकर तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ. सुमेध वावरे व आभार प्रदर्शन कु. प्रणाली चानुरकर हिने केले.