ग्रामगीता महाविद्यालयात सावित्रीबाई फुले स्मृतिदिन….

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

       ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे 10 मार्च 2025 रोजी सांस्कृतिक विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य, डॉ. सुनंदा आस्वले व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.वरदा खटी, डॉ. निलेश ठवकर व डॉ.हुमेश्वर आनंदे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सुनंदा आस्वले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाची ओळख करून दिली व देशाच्या सध्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचा आढावा मांडला.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुमेध वावरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. विवेक माणिक यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.