केंद्रीकरण,विकेंद्रीकरण आणि त्याचे चांगले वाईट परिणाम…

      केंद्रीकरण म्हणजे एकत्रीकरण आणि साठवणूक,राजकीय क्षत्रातिल केंद्रीकारण म्हणजे सत्तेचे केंद्रीकरण,निर्णय प्रक्रियांचे केंद्रीकरण होय.सत्ता एकाचे हाती म्हणजे सत्तेचे केंद्रीकरण.निर्णय एकाचे हाती म्हणजेच सत्तेचे केंद्रीकरण होय.असे झाले की ,हुकूमशाही अस्तित्वात येते.

         हुकूमशहा म्हणजे राजा,राजा म्हणजे देव,देव म्हणजे कर्ता करविता धनी,जन्म ,वाढ,मृत्यू त्याचेच हाती.सर्वेश्वर पिता माता.माणसाचे सर्व आयुष्य जिंदगी त्याचेच हाती देव, राजा , हुकूमशहा हे एकाच अर्थाचे शब्द आणि रूप सत्तेचे केंद्रीकरण होऊन हुकुमशाही निर्माण झाली की सारी जनता गुलाम बनते.

        गुलाम याचा अर्थ तोंड असून मुक्का,कान असून बहिरा,डोळे असून आंधळा,हात पाय असून पंगू , बुध्दी असून बुद्धिहीन,परावलंबी,सांगकाम्या नोकर, ज्याने आपला आत्मविश्वास,हिम्मत,कौशल्य,आपल्यातील सुप्त गुण हरुन बसला आहे,असा दुर्बल माणूस म्हणजेच गुलाम.. दुसरा गरीब प्राणीच म्हंटले तरी चालेल जसा की हत्ती घोडा बैल गाय शेळी मेंढी.” मुक्की बिचारी कुणी हाका”.

       सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे लोकशाही आणि निर्णय घेणारा एक नसून अनेक जण तसेच कायदे करणारा एकटा नसून बहुमताने बनविलेले कायदे,सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे देशातील मुख्य दोन सरकारे एक केंद्र सरकार आणि दुसरे म्हणजे राज्य म्हणजे प्रांत सरकारे.असे सत्तेचे मुख्य दोन विभाजन.प्रांतिक सरकारचे विकेंद्रीकरण म्हणजे स्थानिक सरकारे.म्हणजे जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत.याचा अर्थ सत्ता एकत्र वटली जाऊ नये ,निर्णय घेण्याचा अधिकार एकाच सरकारकडे असू नये म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण करून म्हणजे वाटप करून सत्ता ही प्रत्येक गावापर्यंत पोहचविली आहे.यासच लोकशाही म्हणतात.हुकूमशाही मध्ये असे नसते.सत्ता एकाच्याच हाती एकवटली जाते.राजा बोले दल हाले,अशी परिस्थिती हुकुमशाहीत असते.मग राजाने कितीही चुका केल्या ,नाश केला तरी त्यास जाब विचारण्याचा हक्क कुनासही नसतो.हा दुष्परिणाम हुकुमशाही च असतो.सत्तेचे केंद्रीकरण यातून हुकूमशहा जन्मास येतो.आणि सत्तेच्या विकेंद्रीकारणातून लोकशाही जन्मास येते.म्हणून भारतीय संविधानाने लोकशाहीची व्यवस्था स्वीकारली आहे.

         संपत्तीचे केंद्रीकरण झाले की त्यातून भांडवलदार निर्माण होतात.ते एकत्र येऊन भांडवलशाही निर्माण करतात.संपती म्हणजे जल ,जंगल,जमीन आणि जमिनीतील खनिजे,तसेच कारखाने,उद्योग,व्यापार हे सारे उत्पादन आणि उत्पन्नाची साधने यांचे विकेंदिकरण म्हणजे वाटप जास्तीत जास्त लोकांमध्ये न करता काही मुठीभर मोजक्याच व्यक्तीच्या ताब्यात देणे म्हणजे संपत्तीचे केंद्रीकरण होय.असे केल्याने यातून भांडवलदार निर्माण होऊन ते सर्व सामान्य गरीब आणि मध्यम वर्गीय यांची पिळवणूक शोषण करतात.संपत्तीची साठेबाजी काळाबाजार चोरी करतात.भ्रष्टाचार करतात,महागाई वाढवितात ,लोकांना नको ती व्यसने लावतात.अमली पदार्थांची तस्करी करतात.नको त्या गोष्टी करतात.आणि स्वतःच्या स्वार्थासाठी चैन ऐशारामी जीवन जगण्यासाठी देशाची वाट लावतात.देशातील जनतेला देशोधडीला लावतात.त्यांचे हाल हाल करतात.त्यांच्या हलाकी जीवनास आपण कारणीभूत नाही हे दाखवण्यासाठी देव धर्माचा उपयोग करून घेतात.तुमच्या हलाखीच्या जीवनाचे कारण म्हणजे देवाची इच्छा आणि तुमचे दैव हे आहे,आम्ही नाही,हे सांगण्याची सुपारी गुरू,महाराज,कीर्तनकार,कथाकार यांना सुपारी देतात.पैष्याने त्यांना विकत घेतात.आणि हे देवाचे व दैवाचे कारण सांगायला सांगतात.यातून सामान्यच नव्हे तर शिकलेले लोक पण या झुट्या प्रचारास बळी पडतात.शोषण,पिळवणूक ,भ्रष्टाचार,साठेबाजी,काळाबाजार करून ग्राहकाची फसवणूक करून,त्यांना अक्षरशः लुटून आम्ही श्रीमंत झालोत,हे सांगत नाहीत.

      सरकार हे भांडवलदारांचे च असते.ते बँकाचे जास्तीत जास्त पैसे शेतकरी कष्टकऱ्यांना न देता या भांडवलदारांना,कंत्राटदारांना देते.ते लाखो करोडोचे कर्ज बुडवितात,त्यांना सरकार त्यांचे कर्ज माफ करते.आणि छोट्या उद्योजकांचे,दुकानदाराचे,हातगाडी ,रस्त्यावर बसून वस्तू विकणाऱ्यांचे,शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला दहा वेलेस विचार करते.तरी त्याच सरकारला परत हे अज्ञानी मते देतात.हे दुर्दैवच म्हंटले पाहिजे.नव्हे हे अज्ञानच होय.सरकार भांडवलदारांना कारखान्यासाठी सरकारी जमिनी फुकट देते,बँकेचा पैसा,एम आय डी सी तील प्लॉट रस्ते वीज इत्यादी सुविधा पुरविते.शेतकऱ्यांच्या जमिनी पण जबरीने कमी भावात घेऊन या भांडवलदारांना देते.ज्या जमिनीत ,डोंगरात , माळात कोळसा,तांबे,सोने, जस्त,खडक आहे अशा जमिनी अल्प दरात सरकार यांना देऊन यांना मोठे करते,आणि शेतकऱ्यांना तेथून उठविते.पाण्याचे केंद्रीकरण करणेसाठी मोठ मोठे धरणे बांधते आणि शेतकऱ्यांना विस्थापित करते.जंगले नष्ट करते.याचा अर्थ जल जंगल जमीन ही पर्यावरण टिकविणे चे काम करणारी साधने नफा कमाविनेसाठी भांडवलदारांचे हाती देऊन जल जंगल जमीन यांचे नैसर्गिकपण गुण नष्ट करते.खरे तर मोठमोठी धरणे करून पाण्याचे केंद्रीकरण करायचे साऱ्या वाहत्या नद्या आटवायच.त्यांचे डबके बनवायचे,या पेक्षा पाण्याचे विकेंद्रीकरण केले पाहिजे.म्हणजेच डोंगर माथ्यावर व उताराला चरी काढून ,छोटे छोटे पाझर तलाव , माती बांध,आणि दऱ्या खोऱ्यात सिमेंट बांध,सपाट जमिनीवर बंडींग करून माती आडवा पाणी जिरवा,हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आणि दर्जेदार राबविला तर पाण्याचे विकेंद्रीकरण होईल.पाणी माती याची धूप होणार नाही.व्याया जाणार नाही,सर्वांच्या विहिरींना पाणी जाईल,झरे मोकळे होतील,नद्या बारा महिने वाहत्या राहतील.पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही,उष्णतामान वाढणार नाही.जंगले जिवंत राहतील.

    जमिनीचे केंद्रीकरण काही मूठभर लोकाकडेच आहे.अजून होत आहे,जंगलाचे केंद्रीकरण आणि ठेकेदारांच्या ताब्यात या मुळे त्याचेही केंद्रीकरण होऊन फायदा अनेकांना होण्या ऐवजी मूठभर लोकांनाच होतो आहे.असे होऊ नये यासाठी जमिनीचे जंगलाचे विकेंद्रीकरण झाले तर त्यांचे संरक्षण विकास आणि अनेकास फायदा होईल.एकंदरीत,पैसा,खनिजे,जल जंगल जमीन या साधनांचे केंद्रीकरण झाले तर भांडवलदारी व्यवस्था निर्माण होईल,आणि विकेंद्रीकरण झाले तर लोकशाही व्यवस्था निर्माण होईल.

      शिक्षण आरोग्य या महत्त्वाच्या बाबी.यांचे पण खाजगीकरण झाले तर ते हुकुमशाही स पोषकच होईल.मुठभरणाच याचा लाभ मिळेल.शिक्षण अभावी बहुतांशी जनता वंचित झाली तर संपती मिळविण्यास पण लायक बनणार नाहीत.आरोग्य मिळाले नाही तर मरणाच्या दारात उभे राहतील.यासाठी शिक्षण आणि आरोग्य याचे खाजगीकरण म्हणजे केंद्रीकरण च होय.हे होता काम नये.याचे पण विकेंद्रीकरण असणे गरजेचे आहे.

      तात्पर्य सत्ता संपती शिक्षण आरोग्य यांच्या केंदिकरणाचे अनेक दुष्परिणाम आहेत.आणि विकेंद्रीकरण चे अनेक सुपरिणाम आहेत. एव्हढे जरी वाचकाचे ध्यानी राहिले, तरी उत्तमच.

       लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

                फोन: 9420912209.