
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चिमूर तालुक्यातील अनेक भागात अवैध वाळू उत्खनन व अवैध वृक्षतोड सुरू असताना ते चुप बसले आहेत.संबंधित अधिकारी व कर्मचारी अवैध वाळू उत्खननाकडे आणि अवैध वृक्षतोड कडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत.
याचा अर्थ असा की अवैध वाळू उत्खनन आणि अवैध वृक्षतोड,मुंग गिळून चूप बसणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मान्य आहे असेच म्हणावे लागेल…
तद्वतच ज्या भारतीय संविधानाने त्यांना,”अधिकारी आणि कर्मचारी बनवून उत्तम कर्तव्य पार पाडण्याची व योग्य जनसेवा करण्याची संधी दिली,त्याच संधीची ते टर उडवित असल्याचे निदर्शनास आले असल्याने भ्रष्टाचाराची जडच चिमूर तालुक्यातील तहसीलदार,नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल, वनरक्षक आहेत असे दिसून येते आहे.
लोकशाही देशात लोकहितासाठी इमानदारीने कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या असतात.त्यांच्या अधिकार क्षेत्रातील नागरिकांचे उत्तम मन कायम राखण्यास त्यांनी इमानदारीने कर्तव्य पार पाडावे असे त्यांचे कर्तव्य असणे आवश्यक आहे.
तद्वतच भरमसाठ अवैध वाळू उत्खननाकडे आणि शेकडो अवैध वृक्षतोडीकडे चिमूर तालुकातंर्गत संबंधित अधिकारी कायमचे दुर्लक्ष करताना कुणाची हुजरेगिरी करतात ते त्यांनाच माहीत व ते कुणाचे मानसिक गुलाम झालेले आहेत हे सुद्धा त्यांनाच माहीत.पण,असे अधिकारी व कर्मचारी लोक हिताला आणि राज्य हिताला मारक असतात हे विसरून चालता येत नाही..
जे अधिकारी व कर्मचारी लोकहितासाठी व राज्य हितासाठी कारणीभूत आहेत अशांना चिमूर तालुक्यातील नागरिकांनी वारंवार घेरले पाहिजे आणि त्यांना गावबंदी केली पाहिजे..
चिमूर तालुकातंर्गत खरबो रुपयांचे अवैध वाळू उत्खनन सुरू असताना,त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना खुर्चीचा मोह आवरत नाही,यासारखी केविलवाणी बाब काय असू शकते?
दारोदार भटकणारे शासनाचे उपक्रम सोडले तर अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे केवळ खुर्चीवर बसून कर्तव्य पार पाडणे कितीपत योग्य आहे?.हे त्यांनी प्रामुख्याने स्वतःच स्वतःचे कर्तव्य तपासले पाहिजे.
भिसी वनपाल संतोष औतकार यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असताना ते एकतर्फा कुंभकर्ण निद्रिस्त होते.याचबरोबर मंडळ अधिकारी आणि तलाठी विहिरीत उड्या मारत होते असे म्हणायचे काय?
याचबरोबर अवैध वाळू उत्खननातंर्गत आणि अवैध वृक्षतोड अंतर्गत जनतेच्या मालमत्तेची उघड्या डोळ्यांनी लयलूट होत असताना नागरिकांनी चूप रहावे हे कितपत संयुक्तिक आहे?
मात्र,चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर आणि चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या कर्तव्यदक्षतेकडे आणि अकुशल – कुशल कर्माकडे नागरिकांनी कायदेशीर लक्ष ठेवले पाहिजे या मताचा कायदा आहे.