
ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :– बहुजन नायक मान्य, कांशीरामजी व क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीच्या निमित्ताने आजाद समाज पार्टी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवा संवाद यात्रेचे आयोजन करून शिक्षण, आरोग्य, रोजगार व भ्रष्टाचार या चार मूलभूत प्रश्नांवर युवकांशी संवाद साधणार आहे. ही यात्रा 15 मार्च पासून तर 24 मार्च या दरम्यान असणार असून पक्षाचे पूर्व विदर्भ सचिव धर्मानंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष राज बन्सोड तथा जिल्हा प्रभारी विनोद मंडावी यांच्या नेतृत्वात हि यात्रा जिल्ह्यात फिरणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा व आश्रम शाळेला भेट दिली असता मोठ्या प्रमाणाल समस्या लक्षात आल्या, दुर्गम परिसरात शाळेच्या इमारती पावसाळ्यात गळतात, 2-2 महिने शाळा बंद असतात. आरोग्याच्या सुविधेचा अनेक ठिकाणी अभाव आहे, डॉक्टर कित्येकदा उपस्थित नसतात. रस्त्याचे बांधकाम झाले तर इतके निकृष्ट आहेत कि 4-6 महिन्यात रस्ता खराब होतो.
जिल्ह्यातील एकूणच सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसत आहे.परंतु काँग्रेस भाजपा सारखे पक्ष या विरोधात बोलताना दिसत नाही याचे मुख्य कारण म्हणजे या दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात ठेकेदार असल्याने जिल्ह्यातील बांधकाम विभाग, खनिकर्म विभाग, धान व्यापारी घोटाळा असे घोटाळे आपणास पाहायला मिळत आहेत.
त्यामुळे या ज्वलंत प्रश्नांना घेऊन या यात्रेत जनतेशी, युवकांशी संवाद साधून व समस्या जाणून घेणार आहोत. त्यानंतर हे प्रश्न घेऊन प्रशासनापुढे मांडणार आहोत. जनता दरबार मध्ये यांना उपस्थित करणार आहोत.
यात्रा दोन टण्यात निघणार असून 15 मार्च ला सुरु होऊन पोटेगाव, घोट, एटापल्ली 16 ला एटापल्ली भामरागड, पेरमिली, आलापल्ली 17 मार्च ला अहेरी, सिरोंचा, 18 ला आष्टी व चामोशी असा मार्ग असेल. व 21 मार्च पासून दुसरा टप्पा पेंढरी, धानोरा, वेरकड 22 मार्च ला मालेवाडा, कोरची 23 ला पुराडा, कुरखेडा, 24 ला वळधा, वडसा, आरमोरी या मार्गे यात्रा गडचिरोली मध्ये येऊन समारोप होईल.
दरम्यान आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची चाचपनी करून निवडणुकीत सुशिक्षित तरुणांना आजत समाज पार्टी जास्तीत जास्त संधी देणार आहे. यात्रेमध्ये पक्षाचे विविध पदाधिकारी सुद्धा सामील होणार आहेत.
पत्रकार परिषदेत आजाद समाज पार्टी जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा संघटक हंसराज उराडे, युवा आघाडी अध्यक्ष विवेक खोब्रागडे, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, युवा आघाडी तालुकाध्यक्ष नितेश वेस्कडे उपस्थित होते.