
मोदी / शहा आणि फसणवीस तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यास मी आणि आम्हीच जबाबदार आहोत…
कारण…….
“एकतर आम्हाला प्रथम या लेखकाला ) आमच्या हाफ नॉलेजचा सर्वात जास्त गर्व आहे. दुसरे हे की आम्ही गांधी बाबाला बघितलं आम्ही की विचार,तत्वज्ञान,आचार क्षणात जगाच्या वेशीवर असे टांगतो की, जणुकाही आम्ही त्या गावचेच नाही. ” मुह में राम बगल में छुरी ” असे वर्तन माझ्याकडून ( सार्वजनिक प्रतिनिधीत्व ) होते.
तिसरे असे की,आम्ही ( स्वतःला सोडून ) इतरांना कोरड्या अहंकारातून उत्पन्न झालेल्या अर्ध्या ज्ञानाचा डोस पाजण्यात पटाईत असतो.
आम्ही जातीच्या धर्माच्या नावावर स्वार्थ साधण्यात सर्वात पुढे असतो ( हलाखी आम्हाला स्वतःच्या कुटुंबाव्यतिरिक्त कोणत्याही समाजाचं,जातीचं, धर्माचं (ब्राम्हण / मारवाडी जात सोडून ) स्वार्थापुढे सर्व गौण आहे…..
फुटकळ आणि कितीही स्वार्थापोटी आम्ही सर्व महापुरुषांच्या प्रतिमा बाहेर काढून,मोदी / शहाचे फोटो सुद्धा घरात लावायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही!
अशी आमची लाचार मानसिकताच आमच्या सार्वजनिक जीवनात आमचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरली आहे.म्हणूनच तिसऱ्यांदा ही जोडी केंद्रात आणि राज्यात सत्तेत आली आहे.
आम्ही गेल्या वर्षीच्या निवडणुकीत अनुभवले की कितीतरी जीपमधून EVM मशीन पकडल्या…..
कितीतरी नोटांची बंडले वाटताना विनोद तावडेला नालासोपाऱ्यात पकडले……
हे का घडतं?
तर देणारा देतोय, परंतु घेणारा सुद्धा घेण्यासाठी एका पायावर तयार असतोय…
म्हणून देतोय ना!
अशी आमची वयक्तिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्तव्याच्या बाबतीत वृत्ती झाल्यामुळेच, ही RSS /भाजप,मोदी,शहा आणि राज्यात ही मंडळी.शिंदे, अजित पवार तर थूकलेलं चाटून पुसून खाणारी मंडळी सत्तेच्या स्वार्थासाठी भाजपमय होऊन आपले पक्ष विसर्जित केले तरी त्यात नवल वाटण्याचे काहीही कारण नाही.कारण जेलच्या हवेपेक्षा हॉटेलच्या बाल्कीनीतली हवा कधीही चांगलीच.
आपल्या अशा सार्वजनिक गैरवर्तनामुळे आमचा देश आणि आम्ही आमच्या पुढच्या पिढ्या भिकारी बनवून बरबाद करण्याची सुरवातीची पहिली पायरी ओलांडत आहोत….
अहो जो माणूस टी.व्ही.चॅनलवर लाईव्ह ठासून सांगतो की,मी राष्ट्रवादी सोबत जाणार नाही…….
जाणार नाही……
जाणार नाही…….
ते शक्यच नाही……!
एक वेळ आम्ही अविवाहित राहू.पण सोबत जाणार नाही. म्हणनारा.लग्नही करतो लेकरंही पैदा करतो. मग ही झालेली लेकरं अनौरस समजू काय आम्ही?
असा सर्वात खोटारडा माणूस पुरोगामी महाराष्ट्राचा पुरोहितगामी महाराष्ट्र बनविण्यासाठी सत्तेत बसला आहे!
आता आम्ही टाळ्या वाजवीण्याशिवाय आमच्या हातात काहीही नाही!
अशीच आम्ही आमचीच लाचार अवस्थेचे शिल्पकार ठरलो आहोत.केवळ आणि केवळ गांधी बाबापुढे नतमस्तक झाल्यामुळेच…
वेळीच आम्ही गांधी बाबाला ठोकरलं असतं…
वेळीच EVM ला विरोध करणाऱ्यासोबत आंदोलन केलं असतं.काहीही करून बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्यायला ( निवडणूक आयोगाला व्यवस्थेला ) भाग पाडलं असतं.संविधानाची शक्ती बळकट झाली असती.आणि निश्चितपणे तडीपार जेलमध्ये दिसला असता.विश्व् गुरु कोणत्यातरी मठात गांजा फुकत बसला असता!
परंतु ,भोगू कर्माची फळे. त्याशिवाय अन्य पर्याय नाही.
कदाचित 2029 च्या सुद्धा लोकसभा निवडणुका होतील याची शाश्वती नाही……
कारण या व्यवस्थेचं आम्ही काहीही उखडू शकत नाही.हे सिद्ध झालेलं आहे….!
कारण महापालिकांच्या निवडणुका कोणत्याही कारणाने का होईना,निवडणुका झाल्या नाहीत.प्रशासकावरच कार्यरत आहेत.कोणत्यातरी पक्षाचा मोर्चा यासाठी निघाला का?
कोणीतरी साधे निवेदन तरी दिले का?
म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की,राजकीय सत्ताधाऱ्यानो तुम्ही आमच्या लोकशाहीवर, संविधानावर,आमच्या मूलभूत हक्कावर बलात्कार जरी केला तरी आम्ही तो कुणालाही न सांगता सहन करून अनौरस पुत्राला जन्मही द्यायला तयार आहोत.त्याला बिनबापाचा पुत्रही म्हणून पालन पोषण करायला तयार आहोत….
असे आम्ही या स्वतंत्र भारताचे गेल्या 75 वर्षातील नपुंसक लेकरं निपजलो ( यात अनंत भवरे प्रथम ) आहोत.
म्हणूनच एक धूर्त विश्व गुरु,तडीपार गृहमंत्री,एक खोटारडा मुख्यमंत्री या देशाला व महाराष्ट्राला लाभले.केवळ आणि केवळ आमच्या नाकर्तेपणामुळेच…