नवजीवन (सीबीएसई) मध्ये बालवाडी पदवीदान सोहळा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्राइमरी स्कूल (सीबीएसई) साकोली येथे बालवाडी पदवीदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

       या कार्यक्रमासाठी अध्यक्षा प्राचार्या भारती व्यास, शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रमुख उपस्थिती मंगेश वासेकर, मुख्य अधिकारी नगरपरिषद साकोली, सलीम शाह, वन अधिकारी साकोली, सौ.शर्मिला कछवाह, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर उपस्थित होते.

        समारंभाची सुरुवात ज्ञान आणि बुद्धीमत्तेच्या प्रतीकात्मक सोहळ्याने तसेच शारदा मातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व सुंदर अशा शारदा स्तवनाने करण्यात आली. 

         या सोहळ्याची सुरुवात उपस्थित मान्यवर, पालक यांच्या उपस्थितीत बाल पदवी धारकांच्या भव्य मिरवणुकीने करण्यात आली. या मिरवणुकीत चिमुकल्यांवर पुष्प वर्षाव करून मोठ्या उत्साहाने सर्वांचे भव्य स्वागत करण्यात आले. पदवीदान पोशाखात सजलेली ही चिमुकली मुलं आनंदी चेहऱ्यांसह उत्सुकतेने प्रवेश करताच संपूर्ण नवजीवन सभागृह आनंदाने उजळून निघाला.  

     पदवी पोशाखात चिमुकल्यांनी अप्रतिम नृत्य सादरीकरण करून सर्व उपस्थितांची मने जिंकली.

         सर्व पदवीधारकांनी मान्यवरांच्या हस्ते पदवी प्राप्त करून आपला आनंद द्विगुणित केला. बालवाडी पदवीदान सोहळा हा एक अतिशय प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी क्षण होता. जो अभिमान, आनंद आणि कृतज्ञतेने भरलेला होता.

        पालक, शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन या छोट्या विद्यार्थ्यांच्या महत्त्वपूर्ण टप्प्याचा उत्साहात साजरा केला, जो एक अविस्मरणीय अनुभव ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नवजीवन सीबीएसई चे सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोलाचे सहकार्य केले.