
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी वनविभागातंर्गत भिसी उपवनक्षेत्र आहे.भिसी वन उपक्षेत्राचे वनपाल संतोष औतकार आहेत.त्यांचे अवैध वृक्ष तोडणाऱ्या दलालांसोबत साटेलोटे असल्यानेच त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रचंड प्रमाणात होणाऱ्या अवैध वृक्षतोडकडे त्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
या प्रकरणाची वास्तविक माहिती मौजा पारडपार परिसरातंर्गत वृक्षतोड घटनास्थळावर देण्याचा प्रयत्न पत्रकार केवलसिंग जुनी यांनी वनपाल संतोष औतकार यांना केला असता त्यांनी केवलसिंग जुनी यांनाच अटक करण्याची धमकी दिनांक ५ मार्च २०२५ रोज बुधवारला अंदाजे २ वाजताच्या दरम्यान दिल्याचे वास्तव आहे.
संपूर्ण वृक्षतोड प्रकरणातंर्गत सखोल चौकशी न करता आणि मौजा पारडपार परिसरातील तोडलेले ठिकठिकाणची पुर्ण वृक्ष न बघता केवळ एकाच ठिकाणच्या वृक्षांचा पंचनामा वनपाल संतोष औतकार यांनी केलाय आणि अवैध वृक्षतोड करणाऱ्या लाकूडतोड तस्करांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असल्याचे दिसून आले होते.
याचबरोबर दिनांक ३ व ५ मार्चला वृक्षतोड अंतर्गत भरलेले ट्रक सहिसलामत नागपूरला जाण्यासाठी त्यांनीच सहकार्य केले असल्याचे त्यांच्या कर्तव्यहिन मुजोर वृत्ती वरुन दखल न्यूज भारत वेब पोर्टलचे संस्थापक संपादक,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे माजी विदर्भ उपाध्यक्ष, नरवडे ग्लोबल हुमन राईट्सचे माजी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री.प्रदीप रामटेके व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे चिमूर तालुका अध्यक्ष तथा साप्ताहिक पब्लिक पंचनामाचे चिमूर तालुका प्रतिनिधी श्री.केवलसिंग जुनी यांना अनुभवायला आले होते.
याचबरोबर अवैध वृक्षतोड करणाऱ्यां तस्करांना अभय देत वनपाल संतोष औतकार यांनी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होवू दिली.यामुळे त्यांच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या भुमिकेमुळे पर्यावरणाचे संतुलन धोक्यात आले आहे.
एकंदरीत अवैध वृक्षतोड प्रकरण गंभीर असल्याने व या प्रकर्णातंर्गत पत्रकार केवलसिंग जुनी यांना अटक करण्याची वनपाल संतोष औतकार यांनी दिलेली धमकी सुध्दा तितकीच गंभीर आहे.
यामुळे वनपाल संतोष औतकार यांच्यावर फौजदारी कारवाईसह,त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने व चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर यांना प्रथमतः आज निवेदन देण्यात आले.
तहसीलदार श्रिधर राजमाने आणि वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे चिमूर तालुका अध्यक्ष केवलसिंग जुनी,तालुका संघटक विलास मोहिनकर,तालुका उपाध्यक्ष सुनील हिंगणकर,तालुका सचिव सुशांत इंदूरकर,सदस्य शार्दुल पचारे उपस्थित होते.
(निवेदनात वनपाल संतोष औतकार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत…)