
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय.स्कुल (सीबीएसई) साकोली येथील सामर्थ्य हाऊसला ‘हाऊस ऑफ द ईअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या हाऊस ॲक्टिव्हिटी चा समारोप समारंभासाठी शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, अध्यक्षा प्राचार्या सौ. भारती व्यास, प्रमुख उपस्थिती प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे, पर्यवेक्षिका सौ.वंदना घोडेचोर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी सामर्थ्य हाऊसला ‘हाऊस ऑफ द ईअर’ व साहस हाऊसला ‘रनरअप ऑफ द ईअर’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचा सर्वागीण विकासासाठी व विविध क्षेत्रात प्रगती व्हावी या हेतूने अभ्यासाला पुरक अशा हाऊस ॲक्टिव्हिटीची सुरूवात करण्यात आली होती.
यामध्ये विद्यार्थ्यांची समप्रमाणात शौर्य, सामर्थ्य, शक्ती व साहस या चार गटात विभागणी करण्यात आली होती. या हाऊस ॲक्टिव्हिटी अंतर्गत विविध क्रियात्मक, भावात्मक, बौद्धिक व शारिरीक अशाप्रकारे सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
त्यामध्ये मैदानी स्पर्धा, अंतरंग स्पर्धा, गीतगायन, चित्रकला, मुखवटा रंगकाम अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सामर्थ्य हाउसचे प्रभारी शिक्षक वैशाली भगतकर, वैशाली राऊत, शीतल कोरे,सीमा बनकर, स्वेजल शहारे व हाउस प्रमुख कर्तव्य गुप्ता आणि रुचिका पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सामर्थ्य हाऊस ‘हाऊस ऑफ द ईअर’ व साहस हाऊसचे प्रभारी शिक्षक लाछी किरपान, रोझी पठाण, शालिनी धुर्वे, लिलेश्वरी पारधी, छाया केवट, रेखा मस्के, जयंत खोब्रागडे व निषेश शाहू आणि वंशिका पुस्तोडे यांच्या मार्गदर्शनात ‘रनरअप ऑफ द ईअर’ चे मानकरी ठरले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, सचिव सौ. वृंदताई करंजेकर यांनी शाळेचे प्राचार्य व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. विजयी हाऊस च्या जल्लोषाने संपुर्ण नवजीवन परीसर दुमदुमला होता.
या यशाचे श्रेय शिक्षकगण तसेच हाऊस ॲक्टिव्हिटीचे प्रभारी सतीश गोटेफोडे, श्रीधर खराबे, विशाखा पशीने, दिपा येळे व वैष्णवी नंदेश्वर तसेच यांना दिले. समस्त नवजीवन मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सामर्थ्य व साहस हाऊसचे कौतूक केले.