हरणी-महादवाडी ते गोंदोडा रेतीघाटावरुन वाळूचे अवैध उत्खनन सुरू… — महादवाडी येथील सरपंच भोजराज कामडी यांनी ईमेलवर केली तक्रार दाखल…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी

          चिमूर तालुकातंर्गत महादवाडी-हरणी-गोंदोडा रेती घाटावरुन वाळूचे अवैध उत्खनन सुरू असून सदर भरमसाठ वाळू उत्खननाकडे संबंधित तलाठी,मंडळ अधिकाऱ्यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.

             आज सकाळी महादवाडीचे सरपंच भोजराज कामडी हे गोंदोडा रेती घाटवर गेले असता २ ट्रॅक्टर रेती भरुन मौजा हरणीच्या मार्गे ते ट्रॅक्टर नेत असल्याचे दिसून आले.

       त्यांनी गोंदोडा रेतीघाटावर वाळू भरलेले दोन्ही ट्रॅक्कर अडवण्याचा आज प्रयत्न केला असता एक ट्रॅक्टर थांबले तर दुसरे ट्रॅक्टर न थांबता निघुन गेले.

             यामुळे अवैध वाळू उत्खननाचा हा सारा प्रकार त्यांनी ईमेल वरुन चंद्रपूर जिल्हाधिकारी व चिमूर तहसीलदार यांना कळविले आहे.

         मात्र गोंदोडा, खांबाळा, मोटेगाव, तलाठ्यांचे अवैध वाळू उत्खननाकडे होणारे दुर्लक्ष अवैध वाळू उत्खनन सुरू ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर दबाव आहे की,दुसरे काही कारण आहे हे कळायला मार्ग नाही.