जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनेचे पूर्व विदर्भ प्रांत अध्यक्ष पदी दीपक देशपांडे यांची निवड….

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

       जागृत ग्राहकराजा संघटनेच्या महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीची नुकतीच ऑनलाईन मीटिंग झाली. मीटिंगमध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. अधिवेशन कसे झाले ? पुढच्या अधिवेशनात काय असावे? याबाबत सविस्तरपणे चर्चा झाली. संघटनेचे पहिलेच अधिवेशन यशस्वी पार पडले याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

        या बैठकीत ठरल्यानुसार सांगली येथील किशोर लुल्ला, चंद्रपूर येथील दीपक देशपांडे, पुणे येथील सविता बलकवडे यांना प्रांत कार्यकारणीवर घेण्याचे निश्चित करण्यात आले.

     दीपक देशपांडे यांची नागपूर विभाग अध्यक्षपदी निवड करण्याचे निश्चित झाले.

          तर पवन पोलसानी यांच्याकडे कोकण विभागाचे अध्यक्षपद देण्याचे निश्चित करण्यात आले. सविता बलकवडे यांना राज्य कार्यकारणी महिला सचिव या पदावर निवड करण्याचे निश्चित करण्यात आले.

        तसेच प्रत्येक जिल्ह्याला एक पालक असावा अशी संकल्पना मांडण्यात आली. त्यालाही सर्वांनी मान्यता दिली. या संकल्पनेनुसार काही जिल्ह्यांना खालील प्रमाणे पालक पालकत्व देण्यात आलेले आहे. 

त्यात पुणे जिल्हा -दिलीप फडके, सातारा जिल्हा-दिलीप पाटील, सांगली जिल्हा – प्रा.नागनाथ स्वामी, अहिल्यानगर जिल्हा-विद्याधर कुलकर्णी,कोल्हापूर जिल्हा-प्रा रामानंद पुजारी पुणे शहर – सौ. नयन चव्हाण यांना या जिल्ह्यांचे पालकत्व घेऊन त्या त्या विभागात आपली रचना तयार करणे, सर्व पदाधिकारी तयार करणे, व काम सुरू करणे असे करायचे ठरले आहे.

          या कार्यक्रमात किशोर लुल्ला यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. आपण मिटिंगचे निमंत्रण देऊनही कार्यकर्ते उपस्थित राहत नाही याबाबत खेद व्यक्त केला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचा एक अभ्यास वर्ग व्हावा अशी संकल्पना ही त्यांनी मांडली.यापुढील मिटींगला सर्व तालुका,जिल्हा अध्यक्ष व संघटक उपस्थित राहतील यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही ठरवण्यात आहे.संघटनेची दरमहा ऑनलाइन मिटिंग घेण्यात येईल असेही ठरले.

        प्रांत कार्यकरिणी ची पुढील बैठक सातारा जिल्हा येथे एप्रिलमध्ये होईल असे ठरवण्यात आहे.त्या बैठकीत नवीन रचनाही करण्यात येणार असल्याचे ठरले. 

        बैठकीचा समारोप संघटनेचे सचिव प्रा. नागनाथ स्वामी यांनी केला.

        विशेष म्हणजे २२ व २३ फेब्रुवारी रोजी आर्यन वर्ल्ड स्कूल कात्रज पुणे येथे संपन्न झालेल्या संघटनेच्या पहिल्या अधिवेशनात दीपक देशपांडे यांना ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी स्मृती ग्राहक योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून याचवेळी राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडही झाली होती.आता पूर्व विदर्भ प्रांत अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याने मूल नगरी व तालुक्याच्याच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

       कोणतेही पद हे मानाचे स्थान असले तरी वाढलेल्या जबाबदारीचे ते प्रतिक असते आणि ही जबाबदारी सांभाळण्यासाठी समस्त जनता, ग्राहक आणि ग्राहक प्रतिनिधी, व्यापारी संघटना, शासन व्यवस्थेतील अधिकारी, समाजकारणी आणि राजकारणी यांच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन असे मत आमच्या प्रतिनिधी सोबत वार्तालाप करताना दीपक देशपांडे यांनी व्यक्त केले.