
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :- जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार (ता.८) रोजी स्वराज ग्रुप व सक्षम ग्रुप यांच्यामाध्यमातून आळंदीत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उदघाटन आळंदी पोलीस स्टेशनच्या अधिकारी सोनाली फुले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका विनया तापकीर, प्रतिभा गोगावले, शैला तापकीर, सुनिता रंधवे, रुक्मिणी कांबळे, शिवसेना महिला आघाडीच्या अनिता झुजम, भाजपा महीला मोर्चा अध्यक्षा संगिता पफाळ, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली पानसरे, मनिषा थोरवे, राणी रणदिवे, मंगल हुंडारे तसेच शिवसेना नेते उत्तमराव गोगावले, माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे आयोजक आशिष गोगावले व मनोज पवार उपस्थित होते.
आरोग्य शिबिरात महीलांची शुगर, रक्तदाब, स्त्री रोग तज्ज्ञांकडून तपासणी, रक्तगट, मधुमेह, हृदयरोग तपासणी, यकृत आणि किडनी संदर्भातल्या चाचण्यांसह रक्त तपासणी करण्यात आली.
यावेळी महिलादिनानिमित्त उपस्थित महिला अधिकारी व मान्यवर महीलांना गुलाब पुष्प देऊन जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.