मोशीमध्ये महिला दिनानिमित्त इंद्रायणी पुस्तक पेढीचा शुभारंभ…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी :– इंद्रायणी साहित्य परिषद आणि गुरुकुल प्रतिष्ठान यांच्या वतीने मोशी येथे महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी इंद्रायणी पुस्तक पेढी सुरू करण्यात आली. आनंद इंग्लिश मिडियम शाळेच्या मुख्याध्यापिका सरला सोनवणे यांच्या हस्ते या पुस्तक पेढीचे उद्घाटन करण्यात आले. श्री नागेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता गवारे अध्यक्षस्थानी होत्या.

       यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई आल्हाट, डॉ.स्मिता देशमुख, प्रेमा घारे, संगीता सासवडे, अश्विनी सानपुरकर, श्वेता लहुडकर, रुपाली काळे, श्वेता जाधव, तृप्ती साळी, क्रांती बारस्कर इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित होत्या. महिलांमध्ये वाचन संस्कृती रुजावी म्हणून इंद्रायणी साहित्य परिषदेचे प्रवर्तक, साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांच्या संकल्पनेतून या पुस्तक पेढीचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

         वाचनाची आवड असणाऱ्या महिलांना वाचनासाठी मोफत पुस्तके देण्यात येणार आहेत.

         इंद्रायणी साहित्य परिषदेच्या सौ. तेजस्विनी देशमुख यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. सीमा जाधव, कृपाली कालेकर, रसिका सस्ते, शिल्पा फाकटकर, ज्योती हांडे इत्यादी महिला कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. स्मिता देशमुख यांनी प्रास्ताविक, तर कृपाली कालेकर यांनी सूत्रसंचालन केले.