सावरी (बिडकर) ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात साजरा…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी…

      चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बिडकर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लोकनाथ रामटेके होते…

       तर मुख्य मार्गदर्शक म्हणून उपसरपंच निखिल डोईजळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

         महिला दिनानिमित्त सर्व मान्यवरांनी विशेष मार्गदर्शन करताना राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,त्यागमुर्ती रमाई बाबासाहेब भिमराव आंबेडकर,अहिल्याबाई होळकर,रानी झलकारीबाई,माजी पंतप्रधानमंत्री इंदिरा गांधी,माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,संत जनाबाई,संत मदर तेरेसा यांच्या कार्यावर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकला.

      जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच लोकनाथ रामटेके,ग्रामपंचायत उपसरपंच निखिल डोइजळ,ग्रामसेवक निखिल सहारे,ग्रामपंचायत सदस्य दिलीप मोटघरे,सदस्य रामदास खामनकर,सदस्य आशिष घानोडे,ग्रामपंचायत सदस्यां सुरेखा शेंबेकर,सदस्यां अर्चना हनवते,आणि इतर मान्यवर उपस्थित होते.