
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने नवी दिल्ली येथील शक्ती सन्मान समारोह कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे यांनी विशेष मार्गदर्शन केले…
०८ मार्च २०२५
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त देशभरातील महिलांचा सन्मान करण्यासाठी,समाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी,आणखी उत्साहाने पुढे जाण्यास प्रेरित करण्यासाठी “शक्ती सन्मान समारोह” कार्यक्रम आयोजित केला होता.
या शक्ती सन्मान समारोहात समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि गौरव खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा,सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त नवी दिल्ली येथे मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील महिलांनी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती….