
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
भाजप आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या ऑफिस मध्ये जागतिक महिला दिन निमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व झांसीची राणी लक्ष्मीबाईच्या प्रतिमेस माल्यार्पण करून साजरा करण्यात आले.
दरम्यान भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. मायाताई नन्नावरे यांच्या पुढाकारातून दोन महिलांचा सत्कार करण्यात आला.
भाजप चिमूर तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे हे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या प्रवासात व भाजप संघटन मध्ये सतत कार्यरत असल्यामुळे त्यांचे लक्ष शेतीकडे नव्हते.
तेव्हा त्यांच्या पत्नी सौ.कविताताई राजू झाडे यांनी आपल्या शेतीत लक्ष घालून त्या शेती व्यवसायात चांगल्या प्रकारचे शेत पिकांचे उत्पन्न घेतले व घेत असतात.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजप महिला आघाडी चिमूर तालुका अध्यक्ष सौ. मायाताई नन्नावरे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन त्यांचा सत्कार केलाय.
चिमूर मध्ये ऑटो रिक्षा चालवीत कुटुंबं चालवीत असणाऱ्या वंदना घोनमोडेचा शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमुख अतिथी भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे उपस्थित होते.
याप्रसंगी भाजप महिला आघाडी चिमूर शहर अध्यक्ष सौ.दुर्गा सातपुते,नप माजी गट नेत्या सौ.छायाताई कंचर्लावार,आशा मेश्राम,सौ.भारती गोडे,सौ.विना जिवतोडे,सौ.सुषमा पिंपळकर,सौ.वैशाली चन्ने,समीना शेख,नाजिया शेख,सौ.मंदा गायधणी,अरुण लोहकरे,राकेश कामडी आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.