
जागतिक महिला दिनाची सुरुवात भारतात मात्र संविधानामुळेच…
— आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्व माता, भगिनी, मुली अर्थात महिलांना हार्दिक शुभेच्छा…..
विश्वाची जननी म्हणजे आई होण्याचे पावित्र्य निसर्गाने स्त्रीला प्रदान केले आहे. म्हणून संयम, त्याग आणि वेदना यांची सहनशीलतेची त्यागमूर्ती ठरली आहे.
भारतीय महिलांना मनुस्मृतीने अतिशूद्र हिनवून तीच्या शक्तीला कायमचे ठेचण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढेच नव्हे तर आजही 2025 च्या काळात ज्या ब्राम्हण आईने मुलाला जन्म दिलेला असतो. त्याच मुलाच्या प्रथम संस्कार विधीच्या वेळी म्हणजे ” मुंज ” करताना त्या बाळाला पित्याच्या मांडीवर बसून विधी करावा लागतो. त्या खोलीत त्या आईला प्रवेश करण्याची परवानगी सुद्धा नसते……!
कारण ब्राम्हण स्त्रीला अतिशूद्र समजतात ते अतिशूद्रत्व या मुंजिद्वारे कायमचे पुसून टाकण्याचे काम करतात…..!
याचे कारण एकच आहे की, या देशात आर्य ( आताचे ब्राम्हण ) जेंव्हा बाहेरून पाऊणेचार हजार वर्षांपूर्वी आले. तेंव्हा त्यांच्या सोबत त्यांनी त्यांच्या महिला सोबत आणल्या नव्हत्या. येथे येऊन बहुजन आणि इतरांच्या महिलांकडून संतती निर्माण केली. म्हणून ते स्त्रियांना शूद्राच्याही खालची पायरी अतिशूद्र म्हणून निर्माण केली……!
अश्याच स्त्रीला स्त्रित्व प्राप्त करुन देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ” मनुस्मृतीचे ” दहन केले. आणि संविधानातून हा भेदच नष्ट केला.
म्हणून जागतिक महिला दिन हा भारतात संविधान अंमलबजावणी दिनापासूनच खऱ्या अर्थाने सुरुवात झाला. परंतू , त्याची खरी पायाभरणी तथागत भगवान बुद्धानी यशोधरेला भिखू संघात सामील करुन घेण्यासाठी आनंदाला परवानगी दिली तेंव्हापासूनच खऱ्या अर्थाने या स्त्री – पुरुष समानतेला सुरुवात झाली. त्याही पुढे जाऊन म. फुले आणि सावित्रीआई फुले आणि माता फातिमा शेख यांनी शिक्षण देण्याची सुरुवात केल्यामुळे स्त्रीच्या डोक्यात मानाचा तुरा खोवल्या गेला.
परंतू , आजही ग्रामीण स्त्री चार भिंतीच्या आतच आपलं अस्तित्व समजते. “मानसिक मुक्तता ” आजही धर्म द्यायला तयार होत नाही. आजही माता – पित्याच्या मर्जिशिवाय तीला सुशिक्षित असूनही जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य नाही.
तीला दहावी / बारावीच्या पुढे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य सुद्धा ग्रामीण भागात दिसत नाही. त्याचप्रमाणे वैचारिक प्रगल्भता येण्याच्या आतच शारीरिक प्रगल्भता आली असं गृहीत धरून तीला आजही ग्रामीण भागात जोडीदार लादल्या जातो. आणि लवकरच वैचारिक प्रगल्भता येण्या अगोदरच कळी उमलण्याआधीच कुस्करून सूकण्याची वेळ येऊन ठेपते.
अशी अवस्था असतांना सुद्धा तीला नैसर्गिक संयम हा पुरुषांच्या तुलनेत जास्त लाभल्यामुळे ती त्यातूनही मार्ग काढत जगत असते. आपण ऐकतो शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. पण ती मात्र आत्महत्या करत नाही उलट त्याचा संसार मात्र ती धीराने सावरते…..
घरात जर पाहुणे आले तर प्रथम त्यांच्यासाठी भोजन बनवून त्यांना जेऊ घालून तृप्त करणे. त्यानंतर मुलांना पोटभर जेऊ घालून, तीला ते नाही उरले तरी समाधानी राहणे हा स्त्रीचा त्याग आहे.
हा त्याग पुरुष समजून घेतील का?
जन्माच्या वेळेच्या वेदना पुरुष समजून घेतील का….?
समजून जरी घेतल्या तरी त्या मोबदल्यात तीला वैचारिक प्रगल्भतेसाठी लागणारे पारिवारिक विचार स्वातंत्र्य प्रदान करतील का…?
हे सर्वांगीण स्वातंत्र्य ज्या दिवशी भारतीय महिलांना पुरुषांकडून प्रदान होईल. तोच दिवस खऱ्या अर्थाने……
जागतिक महिला दिन असेल…..
परंतू , तरी सुद्धा तो दिन लवकरच उगवेन अशी आशा करुन या जागतिक महिला दिनापासून त्याची सुरुवात आपण पुरूष मंडळी करूया…..
त्यासाठीच या शुभ दिनी हार्दिक शुभेच्छा देऊया…
पुन्हा एकदा माझ्यातर्फे सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा….