चिमूर ते सावरी-माकोना बस सुरू करण्यासंबधाने ग्रामपंचायत सदस्या सुरेखाताई शेंबेकर यांनी चिमूर बस आगार प्रमुखांना दिले निवेदन..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

         चिमूर-सावरी ते माकोना बस सुरू नसल्याने दैनंदिन आवागमन करण्यासाठी तेथील स्थानिक व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

         सावरी (बिडकर) हे शैक्षणिक व आरोग्य दृष्ट्या व बॅक आर्थिक व्यवहार दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे.चिमूर-सावरी ते माकोना बस सेवा सुरू नसल्याने या परिसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना सावरी (बिडकर) अळचणीचा सामना करावा लागतो आहे.

       याचबरोबर चिमूरला आवागमन करण्यासाठी परिसरातील सर्व जनतेला परेशानीचा सामना करावा लागतो आहे.

       यामुळे चिमूर-सावरी- माकोना या मार्गावरील बससेवा लवकरात लवकर सुरु करावे यासाठी ग्रामपंचायत सदस्या सुरेखाताई शेंबेकर यांनी चिमूर बस आगार व्यवस्थापक यांना काल निवेदन दिले.