
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
मौजा पारडपार परिसरात मागिल ३ महिन्यांपासून वनपाल संतोष औतकार यांच्या अभयात अवैध वृक्षतोड सुरू आहे.मात्र या अवैध वृक्षतोडकडे सदर वनपाल अजिबात लक्ष द्यायला तयार नव्हते.
परंतू पत्रकार केवलसिंग जुनी यांच्या जागरुक व कर्तव्यदक्ष पत्रकारितामुळे मागिल ३ महिन्यांपासून सुरु असलेली अवैध वृक्षतोड चव्हाट्यावर (उजेडात) आली.
अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना संरक्षण देत वनपाल संतोष औतकार यांनी शेकडो झाडांची कतल करु दिली.यात मलींदा जमा करण्याचा त्यांचा कार्यभाग असल्याचे त्यांच्या कालच्या बेकायदेशीर व अयोग्य कृतीवरुन लक्षात आले व समोर आले.
अनेक ठिकाणी वृक्षतोड (कत्तल) झालेली असताना त्यांनी एकाच ठिकाणच्या तोडलेल्या वृक्षांचा पंचनामा केला आणि अनेक ठिकाणी तोडून असलेल्या वृक्षांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत,अभय दिलेल्या दलाला तोडलेले वृक्ष नेण्याचा मार्ग मोकळा करून दिला.
पत्रकार केवलसिंग जुनी यांनी मोक्यावर वृक्षतोड संबंधाने वनपाल संतोष औतकार यांना संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला असता,मधात बोलाल तर अटक करु अशी बेकायदेशीर धमकी दिली आणि धाकातंर्गत भिती दाखविण्याचा असफल प्रयत्न केलाय.
चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर यांना अवैध वृक्षतोड घटनेची आणि अवैधपणे तोडलेले वृक्ष ट्रक मध्ये भरत असल्याची माहिती दिल्याने त्यांनी वनपाल संतोष औतकार यांना तात्काळ घटनास्थळी पाठविले.
परंतु वनपाल संतोष औतकार यांनी वृक्षतोड वास्तविक प्रकरणाला अनुसरून मोका चौकशी पंचनामा न करता स्वतःच्या मनमर्जी प्रमाणे केलाय.
यामुळे वनपाल संतोष औतकार यांचे वृक्षतोड करणाऱ्यां दलालांना सखोल हृदयातून आणि मैत्री पुर्वक अंतःकरणातून अभय व समर्थन असल्याचे कालच्या त्यांच्या मुजोर आणि हेकेखोर भुमिकेवरुन दिसून आले.
त्यांनी अवैध वृक्षतोड प्रकरणातंर्गत किती रुपयांची माया जमवली या संबंधाने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली पाहिजे असेच गंभीर प्रकरण वृक्षतोडीचे आहे.
वनपाल संतोष औतकार यांचा अवैध वृक्षतोड बाबत खोटारडेपणा उजेडात आणण्यासाठी चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर हे प्रामुख्याने स्वतः चौकशी करणार काय?हा प्रश्न भयंकर संवेदनशील आहे.
मात्र,चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर हे मौजा पारडपार परिसरातील आणि इतर परिसरातील अवैध वृक्षतोड स्वतः बघणार आहेत आणि यानंतर वास्तव घटनातंर्गत संबंधित दलालावर फौजदारी आणि इतर कारवाई करणार असल्याचे त्यांनी दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांच्यासी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा करताना सांगितले.
परंतु अवैध वृक्षतोडीला अभय देणाऱ्या वनपाल संतोष औतकार यांच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि वृक्षाचे संरक्षण करण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अपयशी ठरले असल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
पत्रकार सुनील हिंगणकर,पत्रकार विलास मोहिनकर हे काल मौजा पारडपार परिसरातील अवैध वृक्षतोड घटना स्थळावर पोहोचले आणि अवैध वृक्षतोड बाबत सभोवतालीची सर्व स्थिती स्वतः बघितली.
यानंतर पत्रकार सुनील हिंगणकर यांनी वनपाल संतोष औतकार यांना इतर सरळ प्रश्न केले की,तुम्ही अनेक ठिकाणच्या तोडलेल्या वृक्षांचा पंचनामा का म्हणून करीत नाही? तुम्ही तोडलेल्या वृक्षांचा परिसर का म्हणून बघत नाही? तुम्ही अवैध वृक्षतोड करणाऱ्या दलाला सहकार्य करताय का? किंवा अभय देताय,तुम्ही पत्रकार केवलसिंग जुनी यांना अटक करण्याची बेकायदेशीर धमकी का म्हणून दिली? तुम्ही पत्रकारांना अटक करण्याची धमकी देऊन त्यांच्या मनात भिती निर्माण करु इच्छिता काय?
मात्र पत्रकार सुनील हिंगणकर यांच्या वरील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता त्यांनी घटना स्थळावरुन काढता पाय घेतला.
भरमसाठ अवैध वृक्षतोड झाली असतांना,दिनांक ५ मार्च २०२५ रोज बुधवारला केवळ एकाच ठिकाणच्या अवैध वृक्षतोड बाबत,”अयोग्य तथा थातूरमातूर पंचनामा करणाऱ्या वनपाल संतोष औतकार यांनी स्वतःला वाचवण्यासाठी वृत्तपत्रात असत्य घटनेला अनुसरून बातम्या प्रकाशित करुन स्वतःची वांव्हा-वांव्हा करुन घेणे कितपत योग्य आहे?.
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या भिसी वनक्षेत्रातील मौजा पारडपार व लागून असलेल्या सर्व परिसरात मागिल २ महिन्यांपासून वनपाल संतोष औतकार यांच्या अभयात अवैध वृक्षतोड सुरू होती.
यामुळे त्यांची कर्तव्य कार्यपद्धत वनांचे संरक्षण करणारी नाही आणि पर्यावरणाचे योग्य संतुलन राखणारी नाही,हे लक्षात येते आहे.म्हणूनच त्यांना सेवेतून बडतर्फ करावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.