
रामदास ठुसे/शुभम गजभिये
नागपूर विभागीय प्रतिनिधी/विशेष प्रतिनिधी…
भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमूर तालुका कार्यकारिणीला विदर्भ अध्यक्ष आशिष सोनटक्के यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.
यामुळे सदर संघटनेच्या चिमूर तालुका अध्यक्षपदी आशिष भिमराव बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर कार्याध्यक्षपदी जगदीश खटूजी मेश्राम यांची करण्यात आली आहे.जगदिश मेश्राम हे वरोरा तालुका अध्यक्ष आहेत.
याचबरोबर चिमूर तालुका उपाध्यक्षपदी मिथून भिमराव कोसे तर तालुका सरचिटणीस पदी शैलेश गुलाब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तद्वतच चिमूर तालुका संघटक पदी आशिष भक्तप्रशाद जिवतोडे याची नियुक्ती करण्यात आली आहे तर मिडीया तालुका अध्यक्षपदी तेजस शंभरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चिमूर तालुका नियंत्रक अध्यक्षपदी वतन गोंडाणे याची नियुक्ती करण्यात आली आहे तर चिमूर तालुका नियोजन अध्यक्ष म्हणून रंजीत शंभरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणून चिमूर तालुका सचिव पदी संघर्ष शंभरकर,विकास केशव नाकाडे,अश्विन नागदेवते,पंकज शंभरकर,संदीप रामटेके,रोशन पाटील,राहुल नंदेश्वर,सुरज पाटील,गोपी घुटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.