शेअर बाजारातील घसरण चिंताजनक :- हेमंत पाटील… — सरकारकडून आश्वासक पाऊल उचलण्याची आवश्यकता…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

             वृत्त संपादिका 

पुणे, ४ मार्च २०२५ 

            शेअर बाजारात सुरू असलेली घसरण चिंताजनक आहे.बाजारात गेल्या काही महिन्यांमध्ये गुंतवणुदारांनी तब्बल ८५ लाख कोटी रुपये गमावले आहेत. सद्यस्थितीत बाजाराला सावरण्यासाठी सरकारने आश्वासक धोरण अवलंबण्याची गरज असल्याचे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.४) मार्च व्यक्त केले.

           शेअर बाजारात गुंतवणुकीत १६ लाखांहून अधिकचे नुकसान झाल्याने नैराश्यातून नाशिक येथील २८ वर्षीय राजेंद्र कोल्हे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे होणाऱ्या अश्या घटना टाळण्यासह नुकसानग्रस्तांनी नैराश्येतून बाहेर येण्याची गरज आहे.

            सरकारने आश्वासक पावले उचलली तर बाजारात विश्वास निर्माण होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार सर्वसामान्यांसाठी कार्यरत आहे.पंरतु, बाजारातील अस्थिरता सरकारच्या नियंत्रणात नाही.असे असले तरी सरकारने जनभावना लक्षात घेता योग्य धोरणांची अंमबलबजावणी केल्यास बाजारात तेजी येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाटील म्हणाले.सरकारने परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित केल्यात बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होवू शकते.गुंतवणुकीत नुकसान झाले तरी निराश होवू नका,असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

             बाजारातील अस्थिरतेमुळे येत्या काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता बळावली आहे,असे मत पाटील यांनी व्यक्त केले.१९९६ नंतर पहिल्यांदाच निफ्टी सलग पाच महिने घसरला आहे.परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर्स आणि बॉंड्समधून २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तीची रक्कम काढल्याचे कारण देखील या स्थितीला काही प्रमाणात कारणीभूत आहे.

           चीन आणि ब्राझीलच्या बाजारात तेजी असल्याने ही रक्कम या बाजारांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. देशांतर्गत मागणी मंदावल्याने अस्थिरता वाढत आहे. व्यापार युद्धाच्या सावटामुळे देखील बाजारात कमकुमत होत असल्याचे संकेत मिळत असल्याचे पाटील म्हणाले.