
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
खोलापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून खोलापूर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सज्जन दिपक धंदर रा. नावेड असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने फिर्यादी मुलीचा पाठलाग करीत शिंगणापूर येथे फिर्यादीस म्हटले की माझे तुझ्यावर प्रेम आहे मला तुझ्याशी बोलायचे आहे माझ्यासोबत चल.फिर्यादीने त्याला नकार दिल्याने आरोपीने फिर्यादीस मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली.
याबाबतची तक्रार फिर्यादी मुलीने खोलापूर पोलिसांत दाखल केली असून त्या तक्रारीवरुन खोलापूर पोलिसांनी आरोपी सज्जन दिपक धंदर याच्या विरुद्ध कलम 78 (1), 351 (2),352, भादवि सहा कलम पोस्को 12 नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास खोलापूर पोलिस करीत आहेत.