
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
देशाच्या आयरन लेडी,उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री, शोषित,वंचित,उपेक्षितांचा बुलंद आवाज,सुश्री बहन मायावतीजी यांच्या अध्यक्षतेखाली बहूजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २ मार्च २०२५ रोजी लखनऊ येथे संपन्न झाली.
देशभरातील प्रमुख राष्ट्रीय नेते,पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य बैठकीला हजर होते.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड.सुनील डोंगरे,प्रदेश महासचिव मुकुंददादा सोनवने,प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी,प्रदेश कार्यकारणी सदस्य रामचंद्र जाधव बैठकीत प्रामुख्याने उपस्थित होते.
बसपा सुप्रिमो बहन मायावती यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित करत सर्व प्रदेश कार्यकारिणीच्या कार्याचा आढावा घेतला.
बैठकीत पक्ष नेते आकाश आनंद यांना पक्षाच्या सर्व पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचा निर्णय बसपा सुप्रिमो बहन मायावती यांनी जाहिर केला.
कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय समन्वयक म्हणून आनंद कुमार आणि माजी खासदार इंजिनियर रामजी गौतम यांची निवड करण्यात आल्याची माहिती डॉ.चलवादी यांनी रविवारी २ मार्चला दिली.
उपस्थितांना संबोधित करताना सुश्री बहन मायावती जी म्हणाल्या की, “अन्नदात्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही,शिक्षण-आरोग्य सेवा,अन्नधान्यावर सरकारने वस्तू आणि सेवा कर लादून सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
जनसामान्यांमध्ये जावून प्रस्थापिक सत्ताधारी पक्ष बहुजनांवर अन्याय करतोय,कशाप्रकारे त्यांचे शोषण केले जात आहे,यासंबंधी जागरूक करावे असे बसपा सुप्रिमो यांनी सांगितले’.
केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेले दावे फोल ठरत आहेत.कोट्यवधी गरीब,दलित,बेरोजगार,आदिवासी,मागासवर्गीय वर्ग तसेच मजूरांच्या स्थितीत कुठलीही सुधारणा झाली नसल्याची खंत बहजींनी व्यक्त केली.विकासापासून वंचित असलेल्यांसाठी कार्य करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.
आगामी निवडणुकांमध्ये सर्वांनी पक्षनिष्ठेने काम करीत बहूजन आंदोलन आणखी बळकट करण्याचे आवाहन यानिमित्ताने बहजनींनी केले, असे डॉ.चलवादी म्हणाले.
सुश्री बहनजी जिवंत असेपर्यंत पक्षाचा कुणीही उत्तराधिकारी राहणार नाही,यासंदर्भातही बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
मान्यवर कांशीराम साहेबांना अपेक्षित चळवळ उभारण्याच्या दिशेने झोकून देत कार्य करण्याचे आवाहन बैठकीतून करण्यात आल्याचे डॉ.चलवादी यांनी सांगितले.
महाराष्ट्र बहुजन समाज पार्टीच्या वतीने नवनियुक्त राष्ट्रीय समन्वयक आनंद कुमार आणि माजी खासदार इंजिनियर रामजी गौतम यांचे अभिनंदन करण्यात आले.