
एके दिवशी माझी मुलगी ( समीक्षा ) शाळेतून घरी आली. शाळेत तीला तीच्या शिक्षिकेने वर्गात शिकवत असतांना सांगितले की,आपल्याला देवाने निर्माण केले.ही संपूर्ण सृष्टी सुद्धा त्यानेच निर्माण केली.हे सर्व ऐकल्यानंतर तीने त्या शिक्षिकेला प्रश्न केला की, “मॅडम,आपल्या सर्वाना देवाने निर्माण केले.तर मग देवाला कुणी निर्माण केलें?
या प्रश्नाचे उत्तर मॅडम तर देऊ शकल्या नाहीत.त्यांनी तर खाली बसवलं.परंतू घरी आल्यावर तीने तोच प्रश्न आम्हाला केला.तेंव्हा तीच्या प्रश्नाचे उत्तर मी तीला समाधानकारक तीच्या मानसिक प्रगल्भतेनुसार दिले.
नंतर मी स्वतः विचार केला की,आमच्या देशातल्या प्रत्येक लहान लेकराने, जर लहानपणीच असे अनेक प्रश्न विचारून आई -वडिलांना, शिक्षक / शिक्षकेना, प्राध्यापकांना,त्या त्या पातळीवर जाउन जरअसे अनाकलनीय प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडले असते.तर पालक,विद्यार्थी, शिक्षक,प्राध्यापक इत्यादी सर्व भारतीय जनता आजपर्यंत गेल्या 75 वर्षात तथागत भगवान बुद्धाच्या कार्यकारणभावाच्या सिद्धांतानुसार विज्ञानवादी, विवेकवादी,मानवतावादी बनून सदविचारी बनली असती….
ज्या सिद्धांताच्या आधारानेच जगात शास्त्रज्ञानी वैज्ञानिक क्रांती घडवून आणली…..
याच मुलीच्या प्रश्नाचा धागा पकडून मी आपल्याला एक प्रश्न करतो की, संपूर्ण जीवनातील 65 वर्षांच्या आयुष्यातील विश्व्ररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला ( केवळ प्रत्येक भारतीय नागरिकाला ) जे ” भारताचे संविधान ” प्रदान केले. त्या संविधानाच्या पहिल्या पानावरील उद्देशीकाच आम्हाला सदविचारी बनण्यासाठी आव्हान करते की, हे संविधान…..
आम्ही भारताचे लोक पासून वाक्याची सुरुवात होते….
आणि शेवटी…..
मी हे संविधान स्वतःप्रत अधिनियमित करुन अंगीकृत करत आहे.
अशी शपथ आम्ही शाळेत दररोज घेऊन सुद्धा आमच्यात सदवीचारिपणा का येत नाही?
या आम्ही भारताचे लोक आणि शेवटच्या मी स्वतःप्रत……
यामध्ये प्रत्येक नागरिकाशिवाय कोणताही राजकीय नेता,कोणताही राजकीय पक्ष,कोणतीही संघटना,कोणताही पदाधिकारी या बाबी गौण आहेत.प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय नागरिक आणि संविधानातून मूलभूत हक्क आणि कर्तव्यातून संविधान जागृत होण्याचे आव्हान करत असतांना सुद्धा आम्ही (सर्व भारतीय नागरिक) या मुलीप्रमाणे सदविचारी का बनू शकत नाही….
जर बनत नसू तर आमच्या शिक्षण,आणि माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला नैतिक अधिकार आहे का?
संविधानाच्या आवाहनानुसार आम्ही भारतीय नागरिक म्हणून जागृतीच्या दृष्टिकोनातून आम्ही गेल्या 75 वर्षात अजून ABCD ला सुद्धा सुरुवात केलेली नाही…
तर मग ही सुरुवात तरी आम्ही कधी करणार की नाही?
साधा एक प्रश्न पुन्हा मी आपल्याला विचारतो, “की संविधानातील मूलभूत हक्कानुसार आमच्या जिवापेक्षाही मोलाचा आमचा मताचा अधिकार आहे असं घटनाकाराने सांगून सुद्धा….
आणि याच RSS / काँग्रेस / भाजप /इतर राजकीय पक्ष / निवडणूक आयोग / सर्वोच्च न्यायालय / राष्ट्रपती / प्रधानमंत्री / देशातील सर्वच राज्यपाल,मुख्यमंत्री या सर्वांनीच आमच्या मताचा अधिकार गेल्या 20 वर्षांपासून EVM द्वारे हिरावून घेतला आहे.वरीलपैकी कुणालाही संविधानाच्या उद्देशीकेतून भारताच्या नागरिकांशिवाय आव्हान केलेले नसताना,आम्ही भारताच्या लोकांनी या EVM चा अन्याय का सहन करावा?
हा माझा प्रश्न या मुलीप्रमाणेच तुम्हाला आहे…..
याचे उत्तर शोधत बसण्यापेक्षा इथून पुढे प्रत्येक निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यास व्यवस्थेला भाग पाडू…..
हीच संविधान जागृतीची सुरुवात गेल्या 75 वर्षातील प्रथम सुरुवात करूया,तीन काळे कृषी कायदे रद्द करवून घेण्याच्या आदर्शाचा,आदर्श घेऊन…..