
ऋग्वेद येवले
उपसंपादक
भंडारा / साकोली :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाबोधी उपासक संघ नागपूर च्या विद्यमाने शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ तालुका पवनी जिल्हा भंडारा येथे दोन दिवसीय बुद्ध धम्म मेळावा दिनांक 27 फेब्रुवारी व 28 फेब्रुवारी 2025 ला मोठा उत्साहात संपन्न झाला.
दिनांक 27 फेब्रुवारी 2025 ला भिक्षू संघाचे व उपासक संघाचे 8.00 ते 9.30 भिक्षु संघाचे अल्पोहार व उपासक-उपासिकांचे भोजनदान त्याचप्रमाणे महापरित्राण पाठ रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत भदंत विनयबोधी महाथेरो व तथागत गौतम बुद्धांचा भिकू संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
दिनांक 28 फेब्रुवारी 2025 ला 12 ते 1.30 वाजेच्या दरम्यान तथागत गौतम बुद्धाच्या पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण भदंत विनयबोधी महाथेरो ,भदंत नागसेन महाथेरो, भदंत प्रशिलरत्न गौतम, भदंत रत्नसार,भदंत मेत्तानंद ,भदंत संघानंद, सदानंद श्रामनेर बुद्धपाल, भिक्षुनी पट्टाचार्य, व संपूर्ण भिक्षु संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
त्यानंतर 1.30 ते 4 वाजेपर्यंत तीन अंकी रमाई नाटक नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.. सायंकाळी 4 ते 6 वाजता संत तुकाराम, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 28 फरवरी 2025 ला सायंकाळी 4 वाजता करण्यात आले.
वरील संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर छत्रपती संभाजी नगर , यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे उपस्थित होते, विशेष अतिथी म्हणून कवी व साहित्यिक मकरंद पाटील जळगाव हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे ,भारत तिबेट मैत्री संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अमृत बनसोड , महाराष्ट्र शासन,समाज भूषण डी जी रंगारी , धम्म प्रचारक लिमचंद बौद्ध, ग्रामपंचायत अधिकारी पौर्णिमा साखरे अड्याळ, दैनिक माझा मराठवाडा वृत्त संपादक प्रवीण तायडे, दैनिक माझा मराठवाडा कार्यकारी संपादक संजय दांडगे, तुळशीदास गवळीकर, कुसुमताई गवळीकर, भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर, प्राध्यापक राजेश नंदपुरे , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे , सामाजिक कार्यकर्ते असित बागडे, रामराव गाडेकर नागपूर, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सामाजिक यावेळी संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अशोक स्तंभ ,सम्राट अशोक, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांना अभिवादन केल्यानंतर संत तुकाराम महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी सरस्वती कॉन्व्हर्ट स्कूल चिचाळ च्या मुलींनी पाहुण्यांचे नृत्य गीताने स्वागत केले. त्यानंतर पत्रकार संजीव भांबोरे यांनी शांतीवन बुद्ध विहाराच्या बाबतीत आपल्या प्रास्ताविकातून सविस्तर माहिती दिली.
यावेळी मार्गदर्शन केल्यानंतर संपूर्ण मान्यवरांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन शांतीवन बुद्ध संचालक जीवनबोधी बौद्ध, शांतीवन बुद्ध विहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध, विहाराचे सहयोगी व पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत वैशाली मडावी नृत्यांगना यांचे भिम गित, रमाई गीत सादर करण्यात आले. त्यांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला.. सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत राष्ट्रीय युवा प्रबोधनकार राज रामरावजी घुमनर कांदळी यवतमाळ व सप्त खंजेरी वादक भाऊसाहेब थुटे वर्धा यांच्या संपूर्ण संचासहित प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
त्यांच्या सुद्धा महाराष्ट्र प्रेरणा कला पुरस्कार सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात त्याचप्रमाणे शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवनबुद्ध व त्यांच्या सहचरणी सत्यफुलाबाई जीवनबोधी बौद्ध यांचा राज्यस्तरीय धम्मरत्न सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ,मानाचा फेटा ,शाल , सहचरणी यांना साडी चोळी, शाल, पुष्पगुच्छ देऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे व संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन नीता सिलेवंत मुंबई यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार तत्व सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांनी केले. शांतीवन बुद्धविहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध (मेश्राम), अश्विन मेश्राम, निखिल जीवतोडे, , गंगाधर गजभिये, खेमराज चवरे अंबादास मेश्राम, प्रमोद वासनिक, समाधान तिरपुडे,तेजस लोखंडे ,आशिष मेश्राम, अरुणा शिलेवंत मुंबई, सत्यफुला बौद्ध, नितीन वानखेडे, गुलाब घोडसे, राजकुमार वाहने,लता भांबोरे यांनी सहकार्य केले.