
अबोदनगो चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्युज भारत
अमरावती :- चिखलदरा तालुक्यातील सिमोरी या गावातील फुलवंती राजू धिकार या महिलेच्या 22 दिवसाच्या बाळाला 65 डागण्या पोट दुखते म्हणून देण्यात आल्या होत्या.
यानंतर बाळाला जिल्हा स्त्री-रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे.या ठिकाणी आयसीयु मध्ये ते बाळ भरती आहे.त्याला गंभीर स्वरूपाचे आजार सुद्धा आहे.त्या सोबतच पोटाला 65 डागण्या दिलेल्या असल्याने त्याचेही इन्फेक्शन होऊ शकते,अशा गंभीर आरोग्य स्थितीत बाळ असताना सुद्धा नातेवाईक दवाखान्यात राहायला तयार नसल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
भारत देशाने व जगाने विविध क्षेत्रात प्रगती केली असली तरी आदिवासी बाहुल्य मेळघाटात अंधश्रद्धेचा आलेख चढत आहे.
मेळघाट परिसरात दरवर्षी विकास कामांवर कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात येतो.तद्वतच कुपोषण थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा या ठिकाणी सक्रिय आहेत.जनजागृतीच्या नावावर सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येतो,तरीही या ठिकाणची अंधश्रद्धा थांबता थांबेना!,”अशी गंभीर परिस्थिती आदिवासी बाहुल्य मेळघाट येथील आहे.
नुकतेच रेट्याखेडा येथे एका महिलेची धिंड जादूटोणा करते म्हणून काढल्या गेली होती. हे प्रकरण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात गाजले असतानाच,एक दीड महिना गेल्यानंतर पुन्हा अंधश्रद्धेपोटी 22 दिवसाच्या मुलाला चक्क 65 डागण्या विडा तापून देण्यात आल्यात.
हा गंभीर स्वरूपाचा प्रकार उजेडात आल्याने अनेकांना चक्राहून सोडले आहे.मेळघाटातील अंधश्रद्धा केव्हा थांबणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
*****
कोट...
22 दिवसाचे बाळ असून ते बाळ जिल्हा स्त्री-रुग्णालय अमरावतीमध्ये एनआयसियु भरती आहे.त्या ठिकाणी त्यावर उपचार सुरू आहेत.त्या बाळाचे 400 ग्राम वजन कमी झाले आहे.पोट फुगी झाली होती म्हणून त्याला स्वतःच्या नातेवाईकांनी डागण्या दिल्या होत्या.सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्रवीण परिसे यांनी बोलताना दिली…
******
कोट….
या 22 दिवसाच्या मुलांच्या आरोग्याच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत.याला हृदयविकार संबंधाने गंभीर स्वरूपाचा आजार आहे.
यासोबतच डागण्या दिलेल्या असल्याने इन्फेक्शन होण्याची भीती आहे.या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
परंतु बाळाला गंभीर स्वरूपाचा आजार असल्याने नागपूरला हलवणे आवश्यक आहे.मात्र त्याचे नातेवाईक सहकार्य करायला तयार नाहीत. आम्ही गावाकडे परत जातो असा हट्ट ते करत आहेत,असे डॉक्टर प्रीती इंगळे बालरोग तज्ञ जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती(डफरीन)यांनी बोलताना सांगितले.