
आम्हाला तुमच्या क्रांतीचे काडीचेही घेणे देणे नाही….
कारण…
“स्वातंत्र्यापूर्वीच्या मनुस्मृतीच्या चार हजार वर्षांच्या इतिहासातील काळ्याकुट्ट अंधारातून आमच्या गचांडीला पकडून फरफटत बाहेर जरी तुम्ही आम्हाला संविधान निर्मितीतून काढला असलात, तरी आमची पूर्वीची लाचारी आणि गुलामीची सवय नष्ट होणारी नाही. हे आम्ही गेल्या 75 वर्षात सिद्ध केले आहे. आणि आता 2014 पासून तर आम्ही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे….!”
याची शेकडो उदाहरणे देता येतील. एकतर RSS /मोदी, शहाला अर्थात संविधान विरोधी शक्तीला रस्त्यावर उतरून आव्हान देण्याची क्षमता केवळ आक्रमक आंबेडकरी समाजातच आहे. परंतू तो सुद्धा स्वार्थापोटी RSS / भाजपच्या गळाला लागून अनेक शकले होऊन गटागटात विभागून आपल्या एकसंघ शक्तीला मुकला ( केवळ तोंडात जोर असून उपयोग नाही, गल्लीतल्या राष्ट्रीय अध्यक्षाने कधी दिल्ली सुद्धा पाहिलेली नसते. एखादे अत्याचाराचे प्रकरण देशात कुठेही घडले की जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी 4/5 जणांच्या गटागटांच्या अनेक तुकड्या रांगेत उभ्या असतात. त्यातील काही राष्ट्रीय नेत्याबरोबरची कार्यकर्ती मंडळी सारख्याच चेहऱ्यांची असतात).
असे का घडते……?
त्याचे कारण एकच की आम्ही आमच्या महापुरुषांच्या निष्ठेचे रूपांतर विष्ठेत करुन ती आम्ही फस्त केली………!
आमचा बुद्धीजीवी वर्ग आणि आम्ही आमच्या तत्ववेत्ते आणि महापुरुषांच्या त्याग आणि क्रांतीला बेईमान होण्यासाठी जणूकांही स्पर्धा निर्माण केली का काय असं वाटाय लागलेलं आहे.
RSS, भाजप, मोदी, शहा सत्तेच्या बळावर कितीही मोठे होऊ द्या………
आणखी मोठे होऊ द्या…….
त्यांच्या मोठे होण्याच्या शक्यतापार होऊ द्या…….
परंतू ,नैसर्गिक नियमांच्या,सिद्धांताच्या पुढे आहेत का?
ज्या सिद्धांतावर लोकशाही मूल्ये स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता अविष्कारीत होत असतात….
मग एवढी मोठी शक्ती आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून आम्हाला प्रदान केलेली असतांना आम्हाला कोणती आणि कशाची भीती आहे…..?
अरे आमच्या अत्यावशक, आवश्यक, सुखाच्या गरजा, विलासाच्या, चैनीच्या सर्व भौतिक गरजा संविधानाच्या उपकाराने भागलेल्या असतांना यातून आम्ही सार्वजनिक त्यागातून सिद्ध न होता क्षुल्लक आणि फुटकळ मानासाठी स्वाभिमान विकणाऱ्यांच्या रांगेत पहिला नंबर लावण्याचा प्रयत्न करावा……….!
या अशा कितीतरी कारणामुळे आमचा आक्रमक आंबेडकरी बाणा लयास गेला….
म्हणून आम्ही या RSS, मोदी, शहाचे गुलाम बनण्यावर 2014 पासून शिक्कामोर्तब केले……!
हा लेख मी कोणत्याही गल्लीतल्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी लिहीत नाही, किंवा त्यांनी त्यांच्या नसलेल्या सदसदविवेक बुद्धीने जागृत होऊन मूळपदावर येऊन संविधानक्रांती समजून घेण्याचा प्रयत्न करावा, यासाठी हा लेख लिहीत नाही. तर हा लेख सर्वसामान्य जनतेने यांचे ( बुद्धीजीवी वर्गांचे, लाळघोट्या लाचार नेत्यांचे ) आचरण संविधानविरोधी शक्तीची शक्ती वाढविण्यासाठी कसे उपयोगी पडत आहे. ते जाणून घेऊन त्यांच्यापासून दूर जाऊन संविधानातून कसे जागृत होऊन RSS / भाजप / मोदी / शहा मुक्त भारत कसा होईल यांचे चिंतन करुन प्रभावशील कृती कशी करता येईल याचा विचार सर्वसामान्य 85 % जनतेने करावा. यासाठीच हा लेख आहे…..
कारण इंग्लंडची राज्यघटना अलिखित आहे……..
अमेरिकेची राज्यघटना केवळ 7 कलमांची आहे………
आमची राज्यघटना तर 395 कोहिनुर हिऱ्यांची घटनाकाराने निर्मिली………
तरी सुद्धा आमच्या देशाची अवस्था इंग्लंड अमेरिकेच्या तुलनेत बिकट का?
त्याचे कारण हेच की कोणत्याही देशाची सर्वसामान्य जनता आपल्या मूलभूत हक्क आणि कर्तव्यासाठी जेवढ्या प्रमाणात जागृत असेल, तेवढ्याप्रमाणात त्या देशाची लोकशाही आणि लोकं सुखी…..!
आणि आमच्या देशाची सर्वसामान्य जनता वरील वर्णनाप्रमाणे असेल तर आम्ही आणि आमचा देश कोणत्या खिजगिनतीत असणार आहोत…….?
हा प्रश्न आपण आपल्या हृदयाला विचारावा (असेल तर, तशी जबरदस्ती नाही, नसेल तर तुम्ही तरी काय करणार..?)
शेवटी संविधान जागृती देशाची प्रगती हाच सर्व समस्येवर उपाय आहे…
परंतू , गेल्या 75 वर्षात आम्ही करु शकलो नाही…….
आणि करु शकत नाही असा शिक्कामोर्तब आम्ही 2014 पासून केल्यामुळे महापुरुषांनो आम्हाला क्षमा करा…….!
कृतिशील आणि झोपेतून उठवणारा (सोंग घेतलेल्यांना नव्हे)