श्रध्दा आणि सत्य…

श्रध्दा आणि सत्य…      

      माणूस जन्माला येतानाच ” भूक ” सोबत घेऊन आला.माणूस आणि त्याची भूक या दोन्ही गोष्टी निसर्गाचाच आहेत,म्हणजे नैसर्गिक आहेत.

       ” भूक ” चे दोन प्रकार 1)शारीरिक भूक. 2)मानसिक भूक. शारीरिक भूक दोन आहेत,पोटाची भूक आणि लैंगिक भूक.जेवल्या शिवाय पोटाची भूक भागत नाही आणि परस्पर आकर्षण असलेले स्त्रीलिंगी व पुरुष लिंगी प्राणी ( माणूस ) यांचा समागम झाल्याशिवाय लैंगिक भूक भागत नाही.लैंगिक भूक ही मनाशी आणि बुध्दीशी संबंधित आहे.त्यामुळे ती सीमित व अमर्यादित ठेवता येते.पण पोटाची भूक यास मर्यादा अमर्याद नसते.म्हणून ती भागविणे क्रमप्राप्त ठरते.

     माणसाला बुध्दी आणि मन या दोन गोष्टी पण निसर्गानेच दिल्या आहेत.म्हणजे त्या पण नैसर्गिक आहेत.

    वरील दोन संदर्भ समोर ठेऊन आजच्या विषयाचे चिंतन आहे.आजचा विषय आहे,श्रध्दा आणि सत्य.

   आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक अध्यात्मिक या मानवी जीवनाच्या सर्वांगात वावरताना माणूस त्यातील तत्त्वज्ञान सिद्धांत ऐवजी व्यवहारासाठी ज्या गोष्टी उपयोगाच्या आहेत ,त्याच स्वीकारतो.याचा अर्थ माणूस हा मुळात म्हणजे निसर्गतः स्वार्थी आहे.त्याला नैसर्गिक भूक आहे,ती भागवणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरते.ते कर्तव्य नाही केले तर तो मारतो किंवा हाल अपेष्टा होतात म्हणून तो वरील प्रत्येक क्षेत्रातील सिद्धांत तत्व पाळत नाही,तर व्यावहारिक बनतो.हे सत्य आहे.

     आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक या प्रत्येक क्षेत्रातील त्याची श्रध्दा तो आपल्या गरजेनुसार पाळत असतो.श्रध्दा पाळण्याचे दोन प्रकार 1)स्वार्थी.. 2) निस्वार्थी.

       पोटापाण्यासाठी किंवा लैंगिक भूक भागविण्यासाठी पाळत असलेली श्रद्धा म्हणजे स्वार्थी श्रध्दा.आणि बुध्दीची भूक भागविण्यासाठी पाळत असलेली श्रध्दा म्हणजे निस्वार्थी श्रध्दा होय.प्रत्येक क्षेत्रात निस्वार्थ श्रध्दा असलेले लोक बोटावर मोजण्याइतकेच असतात.बहुतांशी लोकांचा स्वार्थ च श्रद्धेच्या मागे दडलेला असतो.देव धर्मावरची श्रध्दा पण निस्वार्थी नसते. असो. स्वार्थी भक्त ( अर्थात प्रत्येक क्षेत्रातील ) यात दोन प्रकार आहेत.1)शोषक…2)शोषित. शोषण करणारे हे वरच्या पातळीवरचे तर शोषित हे खालच्या पातळीवरचे असतात.

          खलच्यांचे वरचे भक्त शोषण करीत असतात.आपले वर्चस्व ठेवतात,धाकात ठेवतात.दहशत निर्माण करतात.आपले श्रेष्ठत्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. वंशत्व जपण्याचा अट्टाहास करतात,भेदभाव शीवशिव यास मान्यता देतात.शोषण वर्चस्व श्रेष्ठत्व वंशत्व भेदभाव याची कशी आवश्यकता आहे? ती देवाने आणि दैवाने कशी निर्माण केली? याचे महत्त्व सांगून सर्वसामान्य अडाणी भोळ्या स्वार्थी भक्तांची आर्थिक लुबाडणूक करतात.आणि गब्बर होतात,कोट्यधीश अब्जाधीश बनतात.

           मग ते धार्मिक अध्यात्मिक राजकीय आर्थिक सर्वच क्षेत्रातील वरच्या पातळीवरचे भक्त हे अतिस्वर्थाचे कार्य करतात.कारण आधी श्रध्दा चे महत्व पटविणे आणि श्रध्दाळू चे शोषण करणे हा त्यांचा धंदाच असतो.आधी महत्त्व सांगायचे,त्यातून त्यांचा विश्वास मिळवायचा,विश्वास बसला की मग निष्ठा निर्माण होते,त्याऊन सवय लागते,त्यामुळे माणूस भक्त बनतो ,भक्त बनून पूजा आरती तीर्थाटन ,दन धर्म सुरू होते,या सर्व गोष्टीतून श्रध्दा बळकट होते.ठीक आहे ,होऊ द्या,हरकत नसावी,जर त्यात त्या भक्ताचे काही नुकसान होत नसेल,त्याचे श्रम,पैसा,धन,वेळ वाया जात नसेल तर हरकत नाही.पण पैसा श्रम वेळ काम हे महत्त्वाचे गोष्टी तो श्रद्धेपोटी खर्च करतो ,त्यातून त्याला काय मिळते ? चार पैसे तर वरच्याना मिळतात,यास काय मिळते ? किमान मानसिक समाधान तरी मिळावे ,ते पण मिळत नाही,शोध घेतला तर समजेल.

    आता श्रध्दा ही खरी आहे की खोटी? वास्तविक आहे की काल्पनिक ? योग्य की अयोग्य ? हे प्रस्न प्रत्येक श्रध्दाळू भक्तांनी स्वतःलाच विचारले पाहिजे,आणि स्वतःच त्याचे उत्तर शोधले पाहिजे,तरच आपण आप्लेकडे असलेल्या बुध्दीचा वापर करतो आहोत,हे सिध्द होईल,अन्यथा आपली बुध्दी आपल्या नेत्याकडे किंवा आपल्या गुरूकडे गहाण ठेवली आहे ,असा त्याचा अर्थ होतो.

     आता स्रद्दे मागील सत्य कसे शोधावे ? हे पाहू.जेंव्हा आपण एखाद्या वस्तूचे गोष्टीचे ज्ञान घेतो ,म्हणजे नेमके काय करतो ? प्रथम जर आपणास ती गोष्ट वस्तू संकल्पना हवी असेल तर आधी त्याचा शोध घेतो.” शोधा म्हणजे सापडेल” अशी म्हण आहे.पण हल्ली श्रध्दा भक्ती याचा शोध घेण्याची जरुरीचं नाही.याचे मार्केटिंग फार जोरात चालले आहे,त्याचे प्रतिनिधी (एम.आर.) पुष्कळ झालेत.

        राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात तर प्रचारकांचा सुळसुळाटच आहे.हे प्रतिनिधी स्वतः किंवा कुणाही मार्फत आपणास श्रध्दा चे ज्ञान देतात,माहिती देतात,श्रद्धेचा शोध लावण्याची गरज नाही.त्या आपोआप दारावर चालून येतात.फक्त प्रश्न आहे,संशोधनाचा?कारण सत्य शोधायचे असेल तर आधी त्या विषयाचं शोध घेणे,नंतर त्या बद्दलची माहिती संकलन करणे आणि त्या माहिती चे संशोधन करणे ही सत्य शोधण्याची पहिली पायरी होय.संशोधन करण्यासाठी अनुभव पुरावे तर्क याचा वापर करावा लागतो तेंव्हा कुठे सत्य सापडते.

         श्रध्दा मागील सत्य शोधल्या शिवाय श्रध्दा बाळगणे म्हणजे डोळे झाकून पाणी पिणे होय.यामुळे त्यात कचरा आहे नाही ,हे न पाहता ते पिणे,म्हणजे दुषित पाणी पिणे,म्हणजे रोगाला आमंत्रण देणे होय.श्रध्दा बाळगल्याने रोग होतो की झालेला रोग जातो ? हा खरा प्रस्न आहे.माणसाला जे शारीरिक आणि मांनसिक रोग आहेत ते घळवण्या साठीची श्रध्दा आणि नसलेले रोग निर्माण करणारी श्रध्दा ,असे श्राद्धाचे दोन प्रकार आहेत, हे दोन प्रकार ,आपण जी श्रध्दा बाळगतो त्या मागचे सत्य जाणून घेतल्या शिवाय समजणार नाहीत.आपण जी श्रध्दा बाळगतो,त्यातील तथ्य ,वास्तविकता,त्यामागची भूमिका,त्यामागचे विचार,त्याचे चांगले आणि वाईट परिणाम,योग्य अयोग्य ,शुध्दता अशुद्धतं , पवित्रता पवित्रता,फायदा नुकसान या सर्व गोष्टी पाहणे म्हणजे सत्यता पडताळणे होय.

     म्हणून कोणतीही श्रध्दा स्वीकारताना,किंवा बाळगताना त्यामागची s किँवा त्यातील सत्य शोधणे महत्त्वाचे आहे.

        लेखक : दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

                फोन : 9420912209.