
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या निष्कलंकीत चारित्र्य व समान न्याय तत्त्वाला अनुसरून असतात.यामुळे त्यांनी कर्तव्य पार पाडताना नागरिकांसी आणि प्रशासकीय कर्तव्यात भेदभाव करु नये असा सज्जड इशारा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी चिमूर विधानसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांना दिला.
भिसी येथील नगरपंचायत भवनात २७ फेब्रुवारीला झालेल्या प्रशासकीय सभेत त्यांनी चिमूर विधानसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना इशारा देत स्पष्ट सांगितले की मांडलिकत्व कुणाचे स्विकारु नका आणि मांडलिकत्व स्वीकारायचे असेल तर तुम्ही नागरिकांचे समान न्याय तत्त्वाला अनुसरून कामे निकाली काढू शकत नाही.तद्वतच स्वतःचे कर्तव्य निष्कलंकीत सज्ञेला अनुसरून पार पाडू शकत नाही.
त्याचबरोबर त्यांनी स्पष्ट केले की मांडलिकत्वातंर्गत भेदभाव पुर्ण कर्तव्य पार पाडायचे असतील तर तुम्ही आपली बदली चिमूर तालुक्यातून किंवा चिमूर विधानसभा मतदारसंघांतून काढली पाहिजे.
एकंदरीत खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी चिमूर विधानसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कार्यपद्धत अनुभवली आणि तपासली तेव्हा त्यांना अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची कार्यपद्धत लोकशाही तत्वाला अनुसरून नसल्याचे दिसून आले असावे.
म्हणूनच खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी प्रशासकीय सभेला मार्गदर्शन करीत असताना,”देशात लोकशाही आहे हुकुमशाही नाही,याची आठवण चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांना करुन द्यावी लागली.कर्तव्यात जाणिवपूर्वक भेदभावयुक्त कसूर करणाऱ्या चिमूर तालुक्यातील अधिकऱ्यांवर एवढी गंभीर नामुष्की ओढवली यापेक्षा खेदाची दुसरी कोणती बाब असू शकेल?
लोकशाही कार्यपद्ध सुरू असताना कुठल्याही कर्तव्यातंर्गत चिमूर विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचारी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे बटलिक असल्यासारखे वर्तनुक करतात याचे दुःख व शल्य खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांना असल्याचे त्यांच्या लोकहितार्थ संवेदनशील व मार्मिक वक्तव्यावरुन लक्षात येते आहे.
चिमूर तालुकातंर्गत अधिकारी आमदारांच्या कार्यकर्त्यांचे वेळेत कामे निकाली काढण्यासाठी वेळ देतात आणि त्यांच्या अयोग्य कामाकडे दुर्लक्ष करतात हे नित्याचे रडगराने झाले आहे.
मात्र,सर्वसामान्य जनतेचे कामे वेळेत निकाली काढण्यासाठी यांना कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्याची आठवण होते यासारखे दुसरे आश्चर्य काय असू शकते? तद्वतच नागरिकांचे कार्यालयीन कामे वेळेत न काढणे हा चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसोबत सरळसरळ भेदभाव नाही काय?
याचबरोबर चिमूर तालुकातंर्गत सर्रासपणे अवैध धंद्याकडे होणारे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हा त्यांचा मांडलिकत्वाचा कार्यभाग नाही काय? आणि अवैध व्यवसायाकडे कोण लक्ष देणार!…
कारण कोणतेही असो पण खासदार डॉ.नामदेव किरसान यांना मांडलिकत्वाची परिभाषा चिमूर विधानसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांना सांगावी लागतय आणि लोकशाहीची आठवण करून द्यावी लागतय यांसारखी,”लाजिरवाणी बाब,अधिकाऱ्यांसाठी कोणती असू शकते?
भिसी प्रशासकीय भवनात पार पडलेल्या सभेत खासदार डॉ.नामदेवराव किरसान,चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ.सतिष वारजूकर,काँग्रेस पक्षाचे चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,अप्पर जिल्हाधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार श्रिधर राजमाने,भिसी अतिरिक्त तहसीलदार पाटील,भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार चांदे, साहाय्यक ठाणेदार वाघ, साहाय्यक ठाणेदार मुकेश ढोबळे,अभियंता कारेकार,काँग्रेस पदाधिकारी सचिन गाडेवार आणि इतर मान्यवर तथा प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.