
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर तालुकातंर्गत मौजा नेरी येथील अतिक्रमण हटाव मोहीम थंडावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
याचबरोबर अतिक्रमण हटाव मोहीम फक्त एका विशिष्ट चौकापुरती मर्यादित होती काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तद्वतच गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला वाढत असलेले अतिक्रमण चिंतेचा विषय ठरत आहे.पार्किंगची व्यवस्था नसतांना चारचाकी वाहनांची गर्दी रस्त्यावर फुलुन दिसत आहे.
त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत.तसेच काहींनी सांडपाणी वाहून जाणाऱ्या नालीवर कालम भीम घेऊन घरांचे पक्के बांधकाम केले आहेत.ते अतिक्रमण कोण काढणार?असा प्रश्न नेरी येथील नागरिक एकमेकांना विचारत आहेत.
अतिक्रमण हटाव मोहिमेची तिव्रता वाढण्यापेक्षा ती सध्यास्थित कमी झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम थंडबस्त्यात ठेवल्याची चर्चा ठिकठिकाणी आहे.