ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

       रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

         मानवाच्या शैक्षणिक गरजांच्या परिपुर्ततेसाठी दैनंदिन अध्ययन व अध्यापनासोबतच उच्च शिक्षणामध्ये संशोधनात्मक बाबींना विशेष महत्त्व असून यातूनच अध्ययन व अध्यापनाविषयक गुणवत्ता वाढीस लागून विद्यार्थी व अध्यापकांचा बौद्धिक आणि संशोधनात्मक विकास साधता येतो. संशोधनामधून नवनवीन विषयाचा उलगडा होऊन सामाजिक उत्थान व गरजांच्या परिपुर्ततेसाठी त्याचा हातभार लागतो.

           त्यास्तव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे “नॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट मल्टी-डिसिप्लिनरी ॲडव्हान्सेस इन रिसर्च अँड कंजर्वेशन” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक १ मार्च २०२५ रोजी प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

         या परिषदेच्या निमित्ताने सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालिका किरणताई वडेट्टीवार, संचालक सदस्या रोशनीताई वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत.

            त्याचप्रमाणे प्राचार्या डॉ. आस्वले यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या परिषदेचे उद् घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे तसेच तसेच प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य डॉ. अमीर धमानी, डॉ. आर. जे.अँड्र्यू उपस्थित राहणार आहेत.

         या परिषदेच्या तांत्रिक सत्रासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. रमझान एस. विराणी एज्युकेटर अँड कंजर्वेशन इकॉलॉजिस्ट, शिवरामजी मोघे महाविद्यालय पांढरकवडा यांना आमंत्रित करण्यात आले असून ते वन्यजीव संवर्धनाचे तथ्य आणि गैरसमज व पर्यावरणपूरक पर्यटन यावर चर्चा करणार आहेत.

         डॉ. गजानन डी. मुरतकर आर्ट, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज चिखलदरा हे भारताच्या संरक्षित क्षेत्रांमधील २१ व्या शतकातील वन्यजीव अधिवास व व्यवस्थापन तसेच अजिंक्य आर. कोट्टावार एंग सायंटिस्ट फाउंडर प्रेसिडेंट ज्ञान फाउंडेशन नागपूर हे बौद्धिक संपदा अधिकार या विषयांवर चर्चा करणार आहेत.

          ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे होणाऱ्या या परिषदेनिमित्त संपूर्ण राज्य व देशभरातील अध्यापक वर्ग व संशोधक उपस्थित राहणार असून या परिषदेच्या निमित्ताने संशोधक व विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

          तसेच संशोधक अद्यापक व संशोधक विद्यार्थ्याकडून संशोधन पेपर मागविले असून हे संशोधन पेपर दर्जेदार जर्नल मधून प्रकाशित करण्यात येणार आहेत.

           या परिषदेचे आयोजन स्थानिक ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे होणार असून ही परिषद यशस्वी करण्यासाठी प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. निलेश ठवकर, प्रा. विवेक माणिक, डॉ. मृणाल वऱ्हाडे, प्रा. संदिप मेश्राम, डॉ. हुमेश्वर आनंदे,डॉ. युवराज बोधे, डॉ. प्रणाली टेंभुर्ने, डॉ. संदिप सातव, प्रा. नागेश ढोरे, डॉ. बिजनकुमार शील, प्रा. रोहित चांदेकर व महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापकवृंद परिश्रम घेत आहेत.