माय भारत आऊटरीच कार्यक्रमाची अमंलबजावणी झाली पाहिजे :- डॉ. बिजनकुमार शिल..

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

              चिमूर :- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय तसेच ग्रामगीता महाविद्यालय चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारचा E L P डिजीटल प्रायोगिक शिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

       या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल होते. प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली रासेयो विभागीय समन्वयक डॉ.बिजनकुमार शिल होते.

        त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून माय भारत विद्यार्थ्यात रोजगार विषयक जाणिव जागृती निर्माण करित आहे. त्यांच्या आवडीनुसार करियर निवडता येणार आहे. माय भारत अँप च्या एका क्लीक वरती सर्व जगाची माहिती सेवा तंत्रज्ञान उपलब्ध होईल असे सांगितले.

       तसेच युवा भारत युवादूत विद्यार्थी श्री संदिप जीवतोडे श्री दिलराजसिंग अंधेरेले यांनी ELP द्वारे विद्यार्थ्याना भारतीय कृषी विषयक धोरणाची माहिती तसेच माय भारतच्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ प्रफुल राजुरवाडे यांनी तर आभार डॉ.नितिन कत्रोजवार यांनी मानले.

         या कार्यक्रमाला डॉ. हरेश गजभिये, प्रा.पितांबर पिसे, प्रा.डॉ.राजेश्वर राहागंडाले प्रा.डॉ. लक्ष्मण कामडी प्रा.शितल वानखेडे प्रा.वर्षा सोनटक्के तसेच रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.