
शिक्षण आणि अंधश्रध्दा…
शिक्षण घेतलेले लोक अंधश्रध्दा का पाळतात? असा प्रस्न अनेकांना पडतो,याचे कारण या लेखात विस्ताराने स्पष्ट केले आहे.
शिक्षणाचे दोन प्रकार 1)औपचारिक शिक्षण, 2)अनौपचारिक शिक्षण.
औपचारिक शिक्षण म्हणजे शाळा कॉलेज मध्ये दिलेले शिक्षण,पुस्तकी ज्ञान,बंदिस्त शिक्षण.आणि औपचारिक शिक्षण म्हणजे शाळाबाह्य आणि खुले मोकळे आणि न ठरविलेले ,म्हणजे ज्ञानाला पुस्तकात बंद न केलेले ,म्हणजे ठराविकच ज्ञान नसलेले म्हणजे अनौपचारिक ज्ञान किंवा अनौपचारिक शिक्षण होय.
ठराविक, औपचारिक,बंदिस्त पुस्तकी शाळा कॉलेजचे ज्ञान म्हणजे शिक्षण.यात काय शिकविल्या जाते? स्थानिक बोलीभाषा,इतिहास,भूगोल,विज्ञान,गणित,नागरिकशास्त्र हे विषय शिकविल्या जातात,प्राथमिक व हायस्कूल मध्ये या विषयाचे ज्ञान हे सामान्य असते,मात्र याच विषयाचे ज्ञान कॉलेज मध्ये विस्तारपूर्वक असते,आणि पद्वित्तर ज्ञान हे विस्तारपूर्वक असते,म्हणजे अधिक व सखोल माहिती किंवा ज्ञान असते.
कॉलेजला या औपचारिक ज्ञानाचे स्पेशियलै जेशन होते.म्हणजे विषाशिकरण होते.म्हणजे स्वतंत्र हे विषय शिकवितात,जसे की कला,वाणिज्य,विज्ञान असे तीन भाग स्वतंत्रपणे शिकवतात.कलेत इतिहास भूगोल समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र असे विषय स्वतंत्रपणे विस्ताराने शिकावितात,हेच विषय एम.ए.चे वर्गात सखोलपणे शिकवितात.असेच विज्ञान विषयाचे तीन भाग करून म्हणजे पदार्थ( घन द्रव हवा ) विज्ञान,म्हणजे फिजिक्स,तसेच दुसरा विषय रासायनिक विज्ञान,तिसरा विषय म्हणजे जीवशास्त्र असे विज्ञानाचे तीन स्वतंत्र विषय बी. ए. ले विस्ताराने आणि एम.ए.ले सखोल शिकविले जातात,असेच कॉमर्स म्हणजे वाणिज्य म्हणजेच व्यापार.विषय पण शिकविल्या जातो,यात पण स्वतंत्र विषय आहेत.
या सर्व विषयाचे चार इमारतीत बसून घेतलेले पुस्तकी म्हणजे ठराविक ज्ञान ,म्हणजे निश्चित करून ठेवलेले ज्ञान देणे घेणे म्हणजेच औपचारिक ज्ञान होय.या औपचारिक ज्ञानात,या औपचारिक विज्ञानात श्रध्दा आणि अंधश्रध्दा हा विषय नसतोच,शिकविल्या जात नाही.
जीवनात अर्थशास्त्र राज्यशास्त्र सामाजिक शास्त्र धार्मिक अध्यात्मिक या विषयाचे ज्ञान आवश्यकच आहे,विज्ञान,व्यापार , तंत्रज्ञान याचेची महत्त्व जीवनात आहे,हे सारे विषय मनुष्य जीवन सुखी आनंदी करण्यासाठीच आहेत,तरी माणूस एव्हढे हे औपचारिक शिक्षण घेऊनही माणूस सुखी आनंदी समाधानी नाही.
अध्यात्मिक आणि धार्मिक माणसे पण सतत चिंतातुर असतात,ते पण आत्महत्या करतात,शेतकरी ,मजूर,तरुण हे पण आत्महत्या करतात.याचा अर्थ हे विषय शिकून काय कामाचे ? असा बऱ्याच वेळा प्रस्न पडतो.असो,हा विषय आजच्या लेखाचा नाही.तर आजच्या लेखाचा विषय आहे की,शिक्षणामुळे श्रध्दा अंधश्रध्दा निर्माण होत नाहीत,तर त्या अनौपचारिक शिक्षणातून च निर्माण होतात.म्हणजे आपल्या आईवडील नातवंडे मित्र यांचे वर्तन,सहवास,आणि संस्कार यातूनच श्रध्दा आणि अंधश्रध्दा शिकविले जातात.बंदिस्त शिक्षण म्हणजे शाळा कॉलेज मध्ये हा विषय शिकविल्या जात नाही.
खरे तर श्रध्दा आणि अंधश्रध्दा हा विषय हा विषय किमान मॅट्रिक पर्यंत तरी शिकवायला पाहिजे.शिक्षणात हा विषय नाही,म्हणूनच शिकलेले लोक या विषयात अडकून पडून आपली आर्थिक सामाजिक.राजकीय अध्यात्मिक नुकसान करून घेत आहेत.
अंधश्रध्दा पसरविणारे बुवा बापू दादा पुजारी कथाकार.कीर्तनकार यांची संख्या वरचेवर वाढतच आहे.यांना पण श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक समजत नाही,याचे कारण या विषयाचे औपचारिक शिक्षण यांना मिळालेले नाही.हे सारे फक्त संस्कार शिक्षण घेतलेले आहेत.तेही फक्त अंधश्रद्धेचे च. श्रध्दा म्हणजे काय ,? ती कशी असते,ती का बाळगली पाहिजे ? याचे ज्ञान या सर्व गुरुजन वर्गास नसते.याचे शिक्षण फक्त अंधश्रद्धेचे च असते.म्हणून तेच लोकांना देतात.
पण विश्वास,भक्ती,श्रध्दा म्हणजे काय? ती कुठे ठेवावी? ती कशी जोपासावी? कुठे पाळावी? याचे ज्ञान कथा कीर्तनकार यांना नसते.आता आता सांगायला सुरुवात केले आहेत की,देव दगडात नसतो,आत्म्यात असतो.सर्व जिवात असतो.
म्हणून सारी माणसे सारखीच असतात,भेदभाव शिवशिव करू नका,आई वडिलांची भक्ती हीच खरी भक्ती आहे,गावच तीर्थ आहे.इतरत्र कशाला फिरतो.तिर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी.म्हणजे देव देवळात दगडात तिर्थाच्या ठिकाणी नसतो,तर तो आई वडील बहीण भाऊ यंचेत असतो,सर्व जिवात असतो,म्हणून कुणाचा जीव घेऊ नका,त्यास मारू नका,त्यास मनाने कायाने वाचेने सुध्दा दुखावू नका.हे गाडगेबाबा,तुकडोजी महाराज यांचा उपदेश आताशी कुठे हे महाराज लोक बोलताहेत.
पण यांचे हे बोलणे फारच कमी,म्हणजे श्रद्धेवर कमी बोलतात,आणि अंधश्रध्दावर रात्रभर बोलत असतात.म्हणून लोकांच्या डोक्यात श्रध्दा ऐवजी अंधश्रध्दा च जास्त ठाण मांडून बसलेली आहे.
शिकलेले विज्ञान शिकले,पण विज्ञान म्हणजे मनाचे मानसिक ज्ञान नव्हे तर ते भौतिक ज्ञान होय.म्हणून मानसिक ज्ञान आणि तेही श्रध्दा आणि अंधश्रध्दा या विषयाची ओळख , व सखोल ज्ञान हे शिक्षण झालेल्या लोकांना पण घेण्याची गरज आहे.
क्लास वन, क्लास टु अधिकारी झाला,डॉक्टर इंजिनीयर झाला तो फक्त भौतिक ज्ञान घेऊन झाला.त्याने त्यास मानसिक ज्ञान दिल्या गेले नाही.श्रध्दा आणि अंधश्रध्दा हा विषय मानसिकतेचा आहे.याचे ज्ञान शाळा कॉलेज मध्ये दिल्या जात नाही.ते संस्कारातून च मिळते.
असे असले तरी हा विषय सर्वाशाखेत शिकविल्या गेला पाहिजे.कारण श्रध्दा आणि अंधश्रध्दा हा विषय एक असला तरी याचे दोन भाग आहेत.यातील फरक शिकवीलां पाहिजे.अंधश्रध्दा म्हणजे श्रध्दा नव्हे,हे शिकलेल्याना आधी कळले पाहिजे.
भौतिक वातावरणाचा माणसाच्या मनावर व शरीरावर पण चांगला वाईट परिणाम होतो,हे कळले पाहिजे.हे जेंव्हा कळेल,तेंव्हा घान पाणी तीर्थ म्हणून पिणार नाहीत.त्यात आंघोळ पण करणार नाहीत.आणि आपला अमूल्य वेळ,पैसा,शरीर वाया जाऊ देणार नाहीत.